| |

उपवासाला कुट्टुचे पदार्थ खा आणि १००% पोषण मिळवा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| सध्या भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात अनेकांचे उपवास आणि व्रत वैकल्य असतात. त्यामुळे या उपवासाला प्रामुख्याने फळं आणि कुट्टुच्या पिठाचे पदार्थ खातात. आता तुम्ही म्हणाल फळ तर ठीक आहे पण हे कुट्टु काय आहे?

तर कुट्टु काही धान्याचा प्रकार नाही. तर कुट्टुचं एक छोटसं झाड असतं. त्याला त्रिकोणी आकाराची काही विशिष्ट फळं येतात. ही त्रिकोणी फळं कुटून कुट्टुचं पीठ तयार केलं जातं. मुळात कुट्टु हे या पदार्थाचे हिंदी नाव आहे. कारण याला मराठीत विशिष्ट नाव नाही. मात्र इंग्रजीत याला बकव्हीट नावाने ओळखले जाते. भारतात याची शेती जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिणेतील नीलगिरी पर्वतावर तर उत्तरेकडील काही राज्यात केली जाते. चला तर जाणून घेऊयात हे कुट्टूच पीठ उपवासाच्या दिवशी खाण्याने शरीराला कोणते फायदे होतात.

१)शारीरिक ऊर्जा कायम राहते.
– विशेषतः उपवासाच्या दिवशी अशक्तपणा जाणवतो. तर यावर कुट्टुच्या पिठाचे पदार्थ लाभदायक आहेत. कारण या प्रथिने, मॅग्नेशिअम, ब जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियम, फोलेट, झिंक, मॅग्नीज आणि फॉस्फरस हे महत्त्वाचे पोषक घटक समाविष्ट असतात. त्यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही आणि अख्खा दिवस कार्य ऊर्जा कायम राहते.

२) रक्तदाबावर नियंत्रण राहते.
– कुट्टुच्या पिठात फायटोन्युट्रिएंट कोलेस्ट्रॉल समाविष्ट आहे. यामुळे आपल्या शरीरातील रक्तसंचरण व्यवस्थित राहते. शिवाय रक्तदाबही नियंत्रित राहतो. या व्यतिरिक्त कुट्टुत मॅग्नेशिअयमचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो.

३) मधुमेहावर नियंत्रण राहते.
– कुट्टुत फायबरचे प्रमाण अधिक असते आणि फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढण्यास प्रतिबंध घालते. शिवाय या पिठात मधुमेह प्रकार २ वर रोख लावणारे v विरोधक घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे मधुमेह प्रकार २ एकतर नियंत्रित राहतो वा होत नाही.

४) पित्ताशयाची काळजी घेते.
– कुट्टुच्या सेवनामुळे शरीरात ‘बाइल अँसिड’ तयार होते, यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका टळतो. तसेच कुट्टुच्या पिठात असलेले प्रथिनांचे प्रमाण पित्ताशयाचे खड्यांपासून रक्षण करते. शिवाय कोलेस्ट्रॉलही ही कमी करते

५) हृदयासाठी अत्यंत फायदेशीर.
– कुट्टुत असलेल्या ब जीवनसत्त्वामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहते आणि यातील नियासिनमुळे चांगलल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण सुधारते. याचा फायदा थेट आपल्या हदयास होतो.

६) हाडे मजबूत होतात.
– कुट्टुत कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम हे घटक भरपूर प्रमाणात समाविष्ट असतात. यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.