| | |

सिमला मिरची खा आणि निरोगी रहा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सिमला मिरची हि भाजी विविध पद्धतीने शिजवून खाल्ली जाते. मात्र आजकालच्या बदलत्या चवींप्रमाणे सिमला मिरचीचा सगळ्यात जास्त वापर चायनीज पदार्थ बनविताना केला जातो. मुख्य म्हणजे हे पदार्थ तेवढ्याच आवडीने खाल्लेही जातात. परंतु, यामध्ये काही घातक पदार्थही वापरले जात असल्याने जास्त चायनिज पदार्थ खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. सिमला मिरचीची भाजी, मिक्स कुर्मा, पुलाव, भरलेली मिरची असे विविध पदार्थ खाल्ले जातात. हि सिमला मिरची खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत या विषयी तुमच्यापैकी किती लोक जाणतात?

आपण खात असेलेल्या सिमला मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आतून निरोगी ठेवण्याचे काम करते. यामुळे आपली जीवनशैली कितीही बदलली तरीही आपल्या आयुष्यमानावर याचा परिणाम होत नाही. अनेक गंभीर आजारावर सिमला मिरची गुणकारी आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात सिमला मिरची खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) सिमला मिरचीमध्ये जास्त क जीवनसत्व असत. मात्र, यात क जीवनसत्व विशिष्ट पद्धतीने साठवले जात असल्याने त्यातील आंबटपणा जाणवत नाही आणि यामुळे ज्यांना आंबट पदार्थ आवडत नाहीत त्यांना क जीवनसत्व मिळवण्यासाठी सिमला मिरची खाणे आरोग्यदायी मानले जाते.

२) सिमला मिरची खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. परिणामी शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढत नाही आणि कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.

३) शरीरातील कोणत्याही भागात वेदना होत असल्यास अश्यावेळी सिमला मिरची कच्ची खाणे किंवा सिमला मिरचीचा रस पिणे फायदेशीर आहे. यामुळे वेदना कमी होतात.

४) सिमला मिरचीमध्ये अ जीवनसत्व वाढविणारी कॅरोटीन्स ही द्रव्य असतात. परिणामी आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारते. याशिवाय चष्मा लागल्यास नंबर कमी करण्यासाठीही मदत होते.

५) हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी सिमला मिरची खाणे फायदेशीर आहे. कारण सिमला मिरची खाल्ल्यामुळे हृदयाच्या शिरा बंद होत नाहीत.

६) सिमला मिरचीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे पोटांचे विकार, अपचन, अ‍ॅसिडिटी किंवा गॅस यावर सिमला मिरची खाणे गुणकारी आहे.

७) कॅन्सर असो किंवा ब्रेन स्ट्रोक यांसारख्या रोगापासून शरीराचा बचाव करण्यासाठी सिमला मिरची खाणे फायदेशीर आहे. कारण सिमला मिरचीमध्ये कॅन्सर रोखणाऱ्या प्रतिबंधात्मक पेशी सक्रिय करणारे घटक असतात.

८) सिमला मिरचीत कॅप्सिनॉईड्स नावाचा आरोग्यवर्धक घटक समाविष्ट असतो. हा घटक आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे. त्यामुळे त्वचेची आद्रता टिकून राहते आणि हाडेदेखील मजबूत होतात.