| | |

चारोळी खाणार तो स्वस्थ आयुष्य जगणार; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुका मेवा खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते हे आपण सारेच जाणतो. यात काजू,बदाम, पिस्ता, आक्रोड, मनुका यांचे सेवन अतिशय आवडीने केले जाते. मात्र चारोळी फारसे खाल्ले जात नाहीत. मात्र आकाराने छोट्या दिसणाऱ्या चारोळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. डोकेदुखी, खोकला, बद्धकोष्ठता आणि त्वचेसंबंधीत समस्या दूर करण्यासाठी चारोळी उपयुक्त ठरतात.

अॅनाकार्डियासी नावाच्या झाडापासून चारोळे नामक बिया मिळतात. भारताच्या अनेक भागात याची अनेको झाडे आढळतात. इतकेच नव्हे तर, आयुर्वेदात औषधीसाठी हजारो वर्षांपासून चारोळी वापरले जात आहेत. पोटाशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी चारोळी एकदम उत्तम पर्याय मानले जाते. आयुर्वेदानुसार, बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी चारोळी खाणे फायदेशीर ठरते. शिवाय चारोळी खाण्यामुळे पोटात साठलेले विषारी पदार्थ व मल सहजपणे उत्सर्जित होऊन शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊयात चारोळी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

० पोटातील आतड्यांना आतून साफ करण्यासाठी चारोळी मदत करते. यासाठी रोज रात्री झोपण्याआधी चमचाभर चारोळी खावेत.

० बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठीदेखील चारोळी फायदेशीर ठरतात.

० शौचावाटे वारंवार रक्तस्त्राव होत असेल तर, जेवणात चारोळीचा वापर करावा. यासाठी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, चारोळीची साल शेळीच्या दुधात बारीक करून त्यात मध मिसळून खावे. याचा अतिशय उत्तम व त्वरित लाभ मिळतो.

० चारोळीची पाने आणि मूळे बारीक वाटून लोण्याबरोबर खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

० अतिसारमध्ये जास्त जुलाब होत असतील तर चारोळीचे तेल तांदळाच्या खिचडीबरोबर किंवा जेवणात वापरून खा. याशिवाय चारोळीची पावडर बनवून दुधात मिसळून घेतल्यास लूज मोशन्स लगेच थांबतात.

० चारोळी खाल्लाने प्रजनन क्षमता वाढते, असे एका संशोधनात आढळले आहे.‌ चारोळीतील गुणधर्मांमुळे कामभावना उत्तेजित राहते. परिणामी जोडीदाराशी निगडित समस्यांपासून सुटका होते. इतकेच नव्हे तर संभोगाची इच्छा वाढवण्यासाठी चारोळी खाणे खुप फायदेशीर ठरते.

० वजन कमी करण्यासाठीसुद्धा चारोळी फायदेशीर असते. यामधील पोषक घटकांमुळे ती वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. मात्र चारोळीमध्ये व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन के, नियासिन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी होते. इतकेच काय तर यात मॅग्नेशियम ,फॉस्फरस आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडेदेखील मजबूत राहतात.