| | |

दररोज अंडी खाता? मग या गोष्टींची काळजी घ्याच; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगभरातील कित्येक लोक सकाळचा नाश्ता हल्का पण तितकाच पौष्टिक घेणं पसंत करतात. यात प्रामुख्याने दूध, ओट्स आणि अंडी यांचा समावेश दिसतो. तर बॉडी बिल्डिंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नाश्त्यामध्ये अंडी हा पदार्थ असतोच. याचे कारण असे कि, अंडे स्वादिष्ट तितकेच पौष्टिक असते. यामुळे दररोज अंडे खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. पण दररोज अंडी खातानाही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहेच.

मुळात, अंड प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे न्याहारीसाठी पर्यायी मानले जाते. अंड्यामध्ये अमिनो ऍसिड मुबलक प्रमाणात आढळतात. हे आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करतात. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, बी 12, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतं. याशिवाय हे फॉलेट सेलेनियम आणि अनेक खनिजांचे स्रोत आहे. हे इतके सर्व पोषक घटक एकाच पदार्थात समाविष्ट असल्यामुळे ते खाणे अत्यंत लाभदायक आहे परंतु दररोज खायचे असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. जाणून घ्या-

१) दररोज अंडी खात असाल तर एका दिवसाच्या अंतराने खा. कारण उन्हाळ्यात अंडी पचण्यात अडचण येते आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

२) अंडी खाताना एकावेळी फक्त एकच अंड खा आणि त्याचे सातत्य ठेवा. दररोज २ किंवा त्यापेक्षा अधिक अंडी खाणे शरीराला हानी पोहोचवू शकतात.

३) अंडी शरीराला पोषण आणि ऊर्जा प्रदान करतात. कारण त्यात उच्च प्रथिने आणि समृद्ध पोषक समाविष्ट असतात. पण यामुळे शरीरातील उष्णता वाढून त्रास होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे दररोज अंडी न खाणे उत्तम. तसेच दिवसातून फक्त एकच अंड खा.

४) जर तुम्ही दररोज व्यायाम वा योगा करत नसाल तर दररोज अंड खाणे टाळा, असं केल्याने शरीराला नुकसान होऊ शकतं.

५) नाश्त्यावेळी अंडे खात असाल तर त्यासोबत दूध घेऊ नका. त्यामुळॆ त्वचेचे विकार संभवतात.