| | |

एक्झॉटिक व्हेजी बेबी कॉर्न खा आहारात आणि जगा आरामात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एक्झॉटिक भाज्या खाणे हा आजकालचा नवा आणि एकदम हिट ट्रेंड आहे. त्यामुळे आता अश्या भाज्या फक्त फूड मॉल नाही तर अगदी बाजारातही सहज उपलब्ध आहेत. कारण जसे ट्रेंड येतात तसे मार्केटसुद्धा प्रगत होते. या अश्या भाज्या आहेत ज्यांचा आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो आणि अगदी चवीचवीने त्याचा स्वाद घेतला जातो. यांपैकी एक भाजी म्हणजे बेबी कॉर्न. होय. बेबी कॉर्न हिसुद्धा एक्झॉटिक भाज्यांपैकी एक भाजी आहे. या भाजीचा देखील वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश केला जातो.

बेबी कॉर्नची भाजी हल्ली कोणत्याही हॉटेलमध्ये सहज मिळते. अनेकांना हि भाजी ओळखीची आहे पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी अगदी सोप्प्या भाषेत सांगायचे म्हणजे बेबी कॉर्न हा कॉर्नचा अर्थच मक्याचा कोवळा प्रकार आहे. मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते आणि याची बेबी म्हणून विक्री केली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत या एक्झॉटिक व्हेजी बेबी कॉर्नचा आहारात कसा समावेश करायचा आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० फायदे –

१) बेबी कॉर्नमध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते. त्यामुळे आपली त्वचा आणि केस चांगले राहण्यासाठी याची मदत होते.

२) बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटकांची मात्रादेखील अधिक असते. त्यामुळे आपले शरीर अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी बेबी कॉर्न मदत करतात.

३) तसेच बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी हि भाजी जरूर खावी. यामुळे आपल्या शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.

४) डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी बेबी कॉर्न फारच फायद्याचे असते. बेबी कॉर्नमधील अनेक घटक डोळ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी मदत करतात.

५) इतकेच नव्हे तर, ह्रदयरोगासाठी बेबी कॉर्न फार उपयुक्त आहेत.

० बेबी कॉर्नचा आहारात कसा समावेश कराल?
– बेबी कॉर्नचे आपल्या आरोग्यासाठी अनेको फायदे आहेत. त्यामुळे आहारात हि भाजी खाणे फायद्याचेच ठरते. पण बेबी कॉर्न कसे खायचे किंवा आहारात ह्याचा समावेश कसा करायचा असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जाऊन घ्या खालीलप्रमाणे:-

१) बेबी कॉर्न बटाट्यासारखे उकडून त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चाट मसाला घालून स्मॅश करून खाता येतो.

२) डाएट करणाऱ्यांसाठी हेल्दी फुड म्हणून बेबी कॉर्न हा उत्तम पर्याय आहे. त्याचे बारीक तुकडे करुन फ्राईंग पॅनवर टॉस करून हाकले मीठ आणि चाट मसाला टाकून खा.

३) बेबी कॉर्नचे बारीक तुकडे करुन किंवा उभे काप करुन त्याला आरारुट पावडरमध्ये घोळवून स्टर फ्राय करा आणि टोमॅटो केचअप सोबत खा.

४) बेबी कॉर्न बारीक कापून किंवा त्याला टोचे मारून आवडीच्या इतर भाज्यांसोबत १ ग्लास पाणी अर्धे होईपर्यंत उकळून चांगले शिजवून घ्या. यानंतर त्यात हाकले काळे मीठ आणि पुदिन्याची चार पाच फ्रेश पाणी हाताने तोडून घाला आणि मस्त सूप प्या.

५) बेबी कॉर्नची इतर भाज्या बनवतो अगदी तशी भाजी बनवा. हि भाजी चपाती किंवा भातासोबत खा.

६) बेबी कॉर्न उकडून त्यामध्ये कांदा – टोमॅटो – बारीक शेव- हिरवी मिरची- चिंचेचा कोळ- गूळ- मीठ आणि चाट मसाला घाला. मस्त भेळ बनवा आणि खा.