Fenugreek Seeds
| |

मेथी दाण्याचे सेवन केल्यास शुगर- कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रणात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेथीच्या भाजीसह मेथीचे दाणेदेखील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहेत. कारण मेथीचे दाणे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात. ज्यामुळे अॅनिमियासारखा आजार टाळता येतो. तसेच मेथी दाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. जे शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेऊ शकतात. त्यामुळे मधुमेह आणि हृदयरोग अशा आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तीसाठी मेथी दाणे औषधीप्रमाणे काम करतात. रक्तातील साखरेची किंवा कोलेस्टेरॉलची उच्च पातळी आरोग्याची गुंतागुंत वाढवते. यावर मेथीचे दाणे अत्यंत उपयुक्त आणि प्रभावीरीत्या आराम देतात. मात्र या फायद्यांसाठी मेथीचे दाणे किती प्रमाणात खावेत, ते खाण्याची पध्दत आणि इतर खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Fenugreek Seeds

मेथी दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक साधारण ५०% अर्थात उच्च असते. यामुळे मधुमेहावरील उपचारात, रक्त आणि लघवीतील साखर तसेच उच्च सीरम कोलेस्टेरॉल असणा-या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. काही रुग्णांना मेथीचे दाणे सेवन केल्यानंतर सुरुवातीला अतिसार किंवा गेॅसेसचा त्रास होऊ शकतो. असे झाल्यास एकतर मेथी दाण्याचे सेवन थांबवावे आणि काही काळाने पुन्हा सुरु करावे. मात्र हा त्रास जास्त होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चला तर जाणून घेऊयात मेथी दाण्याचे फायदे मिळवण्यासाठी त्याचे सेवन किती आणि कसे करावे.?

० मेथी दाणे खाण्याचे प्रमाण किती असावे..?

० आरोग्यदायी फायद्यांसाठी मेथी दाणे कसे खावे..?

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी तसेच खा. याशिवाय ते कुटून पाण्यात वा ताकात मिसळून, जेवणापूर्वी १५ मिनिटे खावे.
मेथी दाण्यांचा लगदा (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर) वा भुकटी ही पोळ्या, दही, डोसा, इडली, उपमा, दलिया, ढोकळा, डाळ आणि भाज्यांची आमटी यात वापरता येईल. 

० मेथी दाणे खाण्याचे फायदे काय..?

मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यामुळे     मधुमेहींना फायदा होतो.
Diabetes
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास मेथीच्या दाण्याचे कोणत्याही प्रकारे सेवन केल्यास त्या  स्थितीवर मात करता येते. परिणामी हृदयाचे विविध आजारांपासून संरक्षण होते.
Blood
शरीरात विविध ठिकाणी साचलेली चरबी हि शरीरात गुठळ्या स्वरूपात जमा राहते. यामुळे रक्त संचरण आणि शरीराच्या विविध आंतर क्रियांमध्ये बाधा येते. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्यामुळे हि समस्या देखील दूर होते.
Weight Loss
मेथीच्या दाण्यांसोबत चालण्यासारखा सौम्य व्यायाम नियमित केल्यास शरीराचं वजनदेखील नियंत्रणात राहत.

मेथीचे दाणे हे केवळ आहाराला पूरक असा उपचार आहे आणि नेहमीचे मधुमेह-विरोधी उपचार चालूच ठेवायचे आहेत. तथापि, मेथीदाण्यांचा वापर करण्याने मधुमेह-विरोधी औषधांचा वापर कमी करता येतो. मधुमेह-विरोधी औषधांची वैयक्तिक कमाल मात्रा यासंबंधी सल्ला देता येणार नाही. आपल्या स्थितीच्या अनुसार केवळ आपले डॉक्टरच योग्य ते औषध आणि त्याचा डोस ठरवू शकतात. मधुमेहाची तीव्र गुंतागुंत झाल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.