| | | |

हिवाळ्यात भरपूर लसूण खालं तर हृदय राहील निरोगी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्यात आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून उष्णेतेची गरज असते. यामुळे हिवाळ्यात प्रामुख्याने आलं आणि लसूण खाणे खूप फायदेशीर आहे. तसे तर आपण सगळ्यात हंगामात लसूण आणि आल्याचा वापर जेवणात करतो. पण हिवाळ्यात आपण त्याचे प्रमाण नक्कीच वाढवू शकतो. याचे कारण म्हणजे लसूण अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यास सहाय्यक आहे. म्हणूनच हिवाळ्यात आल्याचा रस, लसूण आणि मध मिसळून खावी. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गजन्य रोग दूर राहतात. लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-व्हायरल यांसह औषधी घटक समाविष्ट असतात. चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या आजारांमध्ये लसूण फायदेशीर आहे खालीलप्रमाणे:-

१) अॅसिडिटी आणि गॅस – गॅस आणि अॅसिडिटीची समस्या असल्यास जेवण करण्यापूर्वी लसणीच्या १-२ पाकळ्या खा. यासाठी तुपात काळी मिरी आणि खडे मीठ टाकून खा. असे केल्यास त्वरित आराम मिळेल.

२) रक्तदाबावर नियंत्रण – रोज सकाळी उपाशी पोटी लसणीच्या २ पाकळ्या खाल्ल्याने मधुमेहामुळे होणारे आजार दूर होतात. परिणामी रक्तदाब ठीक राहतो.

३) मधुमेहात फायदेशीर – लसूण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. शिवाय शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहारात लसूण खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

४) हृदयरोग – लसूण खाल्ल्यास हृदय विकार होण्याची शक्यता कमी होते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसूण खा. असे केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय निरोगी राहते.

५) श्‍वसनाचे आजार – श्वसनसंबंधित कोणताही त्रास असल्यास संबंधीत रुग्णाने दररोज लसणाची एक कढी मीठ घालून गरम करून खावी. याशिवाय तीन पाकळ्या दुधात शिजवून खाल्ल्या तरीही शरीराला फायदा होतो.

६) पोटाचे आजार – पोटाचा कोणताही त्रास असेल तर लसूण, खडे मीठ, देशी तूप, भाजलेली हिंग आणि आल्याचा रस एकत्र मिसळून खा. असे केल्यास पोटाला त्वरित आराम मिळतो.

७) स्किन ऍलर्जीमध्ये आराम – लसणात अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे स्किन ऍलर्जी दूर होते. यासाठी दररोज लसूण खाल्ल्याने फायदा होतो. लसूण खाल्ल्यामुळे अॅलर्जीचे गुण आणि पुरळ दूर होतात.

८) दातांचे आजार – सतत दात दुखणे, ठणकणे, हिरड्यांचे सूज अश्या तक्रारी असल्यास लसूण बारीक करून दुखतंय भागावर लावा. यामुळे दुखण्यात थोडा आराम मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *