Thursday, March 23, 2023

नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय शोधताय? मग मखाना आणि ओट्स खा ना; जाणून घ्या फायदे

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण संपूर्ण दिवसभरात कितीतरी काम करत असतो. कितीतरी लोकांना भेटत असतो. कितीतरी अडीअडचणींचा सामना करत असतो. अशावेळी जर अचानक मूड इम्बॅलन्स झाला तर हि बाब स्वाभाविक मानली जाते. याशिवाय डोकेदुखीने अक्षरशः वीट येतो. परिणामी शारीरिक ऊर्जा हळूहळू कमी होते आणि एका मर्यादेनंतर नकोस वाटू लागत. तुमचही असं होत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मित्रांनो याचे कारण आहे सकाळचा नाश्ता न करणे किंवा टाळणे. होय. सकाळचा नाश्ता टाळल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. परिणामी झोपेत साठलेली ऊर्जा खर्च होत राहते आणि पोटात एक विशिष्ट प्रकारचे आम्ल तयार होते. यामुळे डोकेदुखी, छातीत जळजळ आणि पोटात मुरडा पडल्यासारखे वाटते. त्यामुळे सकाळचा नाश्ता अजिबात टाळू नका.

अनेकांना रोज रोज तेच तेच पदार्थ नाश्ता म्हणून खायचा कंटाळा येतो आणि म्हणून साहजिकच नाश्ता टाळला जातो. तर मित्रांनो अशी चूक करू नका. याउलट दिवसभर उत्साही ठेवणारा नाश्ता करा. जसे कि ओट्स आणि मखाना. हे दोन्ही पदार्थ कमी कॅलरीज आणि अधिक पोषण देणारे पदार्थ आहेत. चला तर नाश्त्यामध्ये ओट्स आणि मखाना खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

> आहारतज्ञ सांगतात कि, मखाना नाश्त्याच्या वेळी खाणे आरोग्यसाठी फायदेशीर आहे. यातून आपल्या शरीराला अनेक पोषकतत्त्वे मिळतात. आरोग्यवर्धक फायद्यांसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी ४ मखाना खाणे फायदेशीर ठरते. मखाना खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

1. मधुमेहींनी रोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त ४ मखाना खाल्ल्यास रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात राहील.

2. दररोज सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्यामुले हृदय मजबूत राहील.

3. मखान्याचे नियमित सेवन केल्यास ताण आणि तणावापासून मुक्ती मिळेल.

4. भूक लागल्यास २ मखाने खाल्ले तर निद्रा नाशाची समस्या दूर होते.

5. रोज मखाना खाल्ला तर किडनी डिटॉन्सिफाईड राहते आणि तिचे कार्य सुधारते.

> आहारतज्ञ सांगतात कि, ओट्स नाश्त्याच्या वेळी खाणे आरोग्यसाठी फायदेशीर आहे. बाजारात हे ओट्स विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात. यातून आपल्या शरीराला अनेक पोषकतत्त्वे मिळतात. आरोग्यवर्धक फायद्यांसाठी रोज सकाळी नाश्त्यात ३० ते ४० ग्रॅम ओट्सचे दूध वा इतर कोणताही पदार्थ बनवून सेवन करणे फायदेशीर ठरते. ओट्स खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

1. ओट्समध्ये आढळणारे विशेष प्रकारचे फायबर बीटा ग्लुकन हे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

2. ओट्समधील फायबर उच्च रक्तदाबाची समस्या कमी करते.

3. ओट्स खाल्ल्याने लवकर आणि सतत भूक लागत नाही परिणामी वजन कमी होते.

4. ऑट्स मध्ये अघुलनशील फायबर असते. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

5. ओट्समधील कॅल्शिअम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे घटक मज्जासंस्था निरोगी ठेवतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...