| | |

गूळ चणे खा आणि शरीराला आतून मजबूत बनवा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गूळ आणि चणे हे दोन्ही पदार्थ भरपूर पोषक द्रव्यांनी समृद्ध आहेत. यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला तुमचे शरीर आतून बळकट करायचे असेल आणि अनेक संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर गूळ चणे खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे. अहो या संयोगाला सुपर फूड म्हटला तरीही चालेल. कारण दिवसभर कितीही कामाचा ताण असो, दरम्यान तुम्ही जर गूळ आणि चणे एकत्र करून खाल्लात तर तुम्ही अत्यंत उत्साही होऊ शकता. शिवाय तुमची शारीरिक ऊर्जादेखील टिकून राहण्यास मदत होते. विश्वास बसत नसेल तर चला जाऊन घेऊयात गूळ आणि चणे एकत्र खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रक्ताची कमतरता भरून निघते – गूळ व हरभरा हे लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत. यामुळे शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर दररोज मूठभर हरभरा आणि थोडासा गूळ एकत्र खा. त्यामुळॆ रक्ताची कमतरता नाहीशी होईल. शिवाय ऍनिमियाचा त्रास होणार नाही.

२) हृदयरोगांपासून संरक्षण – दररोज गूळ आणि चणे खाल्ल्याने हृदयास याचा भरपूर लाभ होतो. गूळ आणि चणे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने यातील पोषक घटक हृदयाचे संपूर्णपणे संरक्षण करतात. यामुळे हृदय विकाराचा झटका आणि हृदयासंबंधित समस्या दूर होतात.

३) यकृताची काळजी – यकृताशी संबंधित कोणताही आजार असेल तर अश्या रुग्णांनी सलग १५ दिवस गूळ आणि चणे खा. यामुळे यकृताची प्रकृती लवकर बारी होण्यास मदत होते.

४) पचनशक्ती सुधार – आजकाल अनेकांना पचनशक्तीशी संबंधित विविध त्रास जाणवतात. यास बदलती जीवनशैली आणि खाणेपिणे कारणीभूत आहे. जर तुम्हालाही पाचक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर गूळ चणे हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय चवीनुसार उकडलेल्या चण्यांमध्ये कांदा, लसूण, मीठ घाला आणि खा. त्यानंतर गूळ खाल्लात तरीही चालेल. यामुळे पाचक प्रणाली बळकट होईल आणि पोटाच्या इतर समस्यांपासून लगेच आराम मिळेल

५) स्नायू आणि हाडांना बळकटी – चणे आणि गूळ स्नायू व हाडांसाठी फायदेशीर आहे. कारण यात कॅल्शियम, लोह, फायबर इत्यादी आवश्यक गुणधर्म आहेत. यामुळे ते नियमितपणे घेतल्यास स्नायू आणि हाडे मजबूत होतात.

६) मासिकपाळीच्या त्रासापासून आराम – अनियमित मासिक पाळी असो किंवा अधिक रक्तस्राव अशावेळी गूळ आणि चणे खाणे महिलांसाठी लाभदायक आहे. कारण यामुळे एकतर मासिक पाळीचे चक्र सुरळीत होते आणि पोटदुखीचा त्रास कमी होतो. याशिवाय क्रॅम्प आणि अधिक रक्तस्रावाच्या समस्येपासून आराम मिळतो.

७) यूटीआय संसर्गापासून रक्षण – आजकाल अनेक महिला यूटीआय संसर्गाची तक्रार करतात. या संसर्गापासून जर संरक्षण हवे असेल तर गूळ आणि भाजलेले चणे एकत्र करून खा. यामुळे लवकर आराम मिळेल.

८) वजनावर नियंत्रण – चणे आणि गूळ यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे समाविष्ट असतात. यामुळे वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते. शिवाय चरबी कमी करण्यासाठी गूळ चणे मदतयुक्त फूड आहे.