| | |

गुळ- चणे खा आणि मिळवा आरोग्यवर्धक लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले आरोग्य निरोगी हवे असेल तर आहारात शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक समाविष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात काही विशेष पदार्थ असायला हवेत ज्यामध्ये गूळ आणि चण्याचा समावेश करण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात. कारण गुळामध्ये ‘आयर्न’ मुबलक प्रमाणात असते. शिवाय गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणदेखील वाढते. या व्यतिरिक्त गूळ खाल्ल्यास त्यातून सोडियम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात. तर मधुमेह आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी चणे फायदेशीर ठरतात. कारण चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स, आयर्न, कॅल्शियम आणि अनेक प्रकारची विटामिन आढळतात. यामुळे चण्याचे नियमित सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच चणे खाल्ल्यामुळे मन तीक्ष्ण आणि बुद्धी तल्लख होते. चला तर जाणून घेऊया गूळ आणि चणे एकत्र खाण्याचे फायदे :-

१) मेंदू तीक्ष्ण – गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते. कारण त्यात व्हिटॅमिन-बी मुबलक प्रमाणात असते जे स्मरणशक्तीला सकारात्मक चालना देते.

२) बद्धकोष्ठता दूर – कमकुवत पचनशक्तीमुळे, बद्धकोष्ठता होते. यावर मात करण्यासाठी गूळ आणि चणे खाणे फायदेशीर असते. याशिवाय त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. जे पचनशक्ती व्यवस्थित ठेवते.

३) हृदयाची काळजी – ज्या लोकांना हृदयाची काळजी घ्यायची आहे त्यांनी गूळ आणि चण्याचे सेवन जरूर करावे. यामुळे शरीराला आवश्यक पोटॅशियम मिळते जे हृदयविकाराचा धोका टाळण्यास सहाय्यक आहे.

४) स्नायूंसाठी फायदेशीर – गूळ आणि चण्यामध्ये प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

५) हाडांसाठी लाभदायक – संधिवात आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी दररोज गूळ आणि चणे खाणे फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे थकवा दूर करण्यासाठी लाभदायक ठरतात.

६) मजबूत दात – गूळ आणि चण्यामध्ये असणारे फॉस्फरस दातांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने दात मजबूत होतात आणि दातांशी संबंधित समस्या दूर राहतात.

७) लठ्ठपणा कमी होतो – गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिजमचे प्रमाण वाढते. यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

८) नैसर्गिक तेज – गूळ आणि चण्यामध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते. यामुळे हे एकत्र खाल्ल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज वाढण्यास मदत होते.