| | |

आहारात मल्टी ग्रेन पोळ्या खा..कारण ; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मल्टीग्रेन पोळ्या म्हणजे काय तर ५ पौष्टिक पिठांनी बनविली जाणारी चपाती. या चपातीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे लोह, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन बी समाविष्ट असते. प्रामुख्याने यात ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, नाचणीचे पीठ, बेसन आणि संपूर्ण गव्हाचे पीठ अशी ५ पीठं एकत्र केली जातात. यानंतर या चपातीची चव वाढावी म्हणून पौष्टिक भाज्यादेखील यात मिसळल्या तरीही लाभदायक आहेत. यात तुम्ही कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर यांचा समावेश करू शकता.

० मसालेदार पौष्टिक चपाती लहान मुलांसाठी अत्यंत लाभदायक आहे. यासाठी तुम्ही काही हिरव्या मिरच्या, मुलांच्या आवडीची भाजी आणि हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं तेल किंवा तूप आणि यासह चवीपुरतं मीठ मिसळून पीठ एकजीव करून घ्या. यानंतर चपाती लाटा आणि नॉनस्टिक तव्यावर खरपूस भाजा. नंतर टोमॅटो सॉससोबत मुलांना खाऊ घाला.
हि पोळी तुम्ही साध्या चपातीप्रमाणे बनवून खाऊ शकता. परंतु यातील पोषण तत्त्व वाढवायची असतील तर वरील कृती जरूर वापरून पहा.

– हि पौष्टिक मल्टी ग्रेन चपाती मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहे. मुलांच्याच नव्हे तर अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या पोळ्या खाऊ शकते. याचे कारण असे कि, मल्टि ग्रेन अर्थात मिश्र धान्य एकत्रित केल्यामुळे त्यातील पोषक तत्वांची वाढ होते. हि पोषक तत्त्वे आपलया शरीराला आतून आणि बाहेरून भक्कम करतात. यातील प्रत्येक पिठात असे काही विशेष गुणधर्म आणि तत्त्व आहेत जी आपल्या शरीराची योग्य रित्या गरज पूर्ण करतात आणि काळजी घेतात. या चपातीमुळे प्रथिने, पोषक तत्त्वे, लोह,फायबर, आणि अजून अनेक गुणधर्म समाविष्ट असतात. जे आपल्याला निरोगी आणि सुदृढ होण्याकरिता सहाय्यक असतात.

० फायदे :-

१) मल्टीग्रेन पीठ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या शरीरात एकाच वेळी विविध पोषक तत्वांची पूर्तता करतात. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

२) आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी शरीराला आवश्यक प्रत्येक पोषण मिळणे गरजेचे असते आणि या पिठात सर्व प्रकारची मर्यादित पोषण समाविष्ट असतात.

३) मिश्र धान्याचा आहारात दैनंदिन वापर केल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. यामुळे आपल्या पचनसंसंस्थेचे कार्य उत्तमरित्या पार पडण्यास सहाय्य मिळते. परिणामी अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

४) मल्टीग्रेन पीठ अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते. ज्यामुळे एकावेळी आपले शरीर आवश्यकतेनुसार सर्व तत्त्व मिळते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्याची क्षमता वाढते.

५) मल्टि ग्रेन पिठाचा एक विशेष फायदा म्हणजे मधुमेह आणि रक्तदाब रुग्णांसाठी हि चपाती फायदेशीर आहे. कारण हि चपाती शरीरात चरबी जमा होऊ देत नाही. यामुळे हृदयाचेही काही प्रमाणात संरक्षण होते.

६) मल्टि ग्रेन चपातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त कॅलरीयुक्त पदार्थ नसता. यामुळे हि चपाती कमी चरबीयुक्त आहे. जी आपल्या शरीरात अनावश्यक मेद तयार करत नाही.

७) याशिवाय जेव्हा शरीराला जास्त फायबर मिळतं, तेव्हा ते वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यामुळे आपण सडपातळ होऊ इच्छित असाल तर आहारात मल्टिग्रेन चपाती अवश्य खा.