| | |

रोज फक्त १ टोमॅटो खा आणि मोठमोठे आजार पळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। टोमॅटो हे एक फळ आणि भाजी दोन्हीसुद्धा आहे. चवीला काहीसा आंबट लागणारा टोमॅटो हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण यामध्ये सायटीक अॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्रा भरपूर असते. तसेच व्हिटॅमीन ए, सी, ई आणि के चा टोमॅटो उत्तम स्त्रोत आहे. हे सर्व व्हिटॅमीन आरोग्यासाठी गरजेचे असतात. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक हि तत्त्वदेखील आढळतात. टोमॅटोमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. बहुतेकदा टोमॅटोचा वापर सॅलड आणि भाज्यांमध्ये केला जातो. पण मित्रांनो दिवसभरात फक्त १ टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे कितीजण जाणता? नाही माहित? मग लगेच जाणून घ्या दिवसभरात १ टोमॅटो खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकार शक्तीत वाढ – रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. टोमॅटो मध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराचे मोठमोठ्या आजारांपासून संरक्षण करू शकते. याशिवाय ताण तणावापासून मेंदूचे संरक्षण करण्यासाठी टोमॅटो लाभदायक आहे.

२) हृदयाची काळजी – टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर आढळतं. त्यामुळे हृदयरोगांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे.

३) युरीन इंफेक्शनसुन संरक्षण – दररोज एक टोमॅटो खाल्ल्यास रक्त शुद्धीकरण होते. तसेच शरीरातील खराब घटक उत्सर्जित करण्यात मदत होते. परिणामी युरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो.

४) पाचनशक्तीत सुधार – टोमॅटोमध्ये फायबरयुक्त घटकांचा समावेश असल्यामुळे पोटाशी संबंधित विकारांमध्ये टोमॅटो फायदेशीर आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाल्ल्यास पाचनशक्ती वाढते.

५) दृष्टी सुधार – टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं. यामुळे टोमॅटो खाल्ल्यास डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढदेखील रोखतो.

६) हाडांची मजबुती – टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमीन के मुळे हाडे मजबूत होतात. तसेच बोन टिश्यू रिपेअर होण्यास मदत होते. टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटी ऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत होते.

७) प्रोस्टेट कँसर आणि ट्युमर – पुरूषांनी जर रोज १ टोमॅटो खाल्ला तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. एवढंच नव्हे तर ज्या लोकांना ट्यूमर आहे, त्यांचा ट्यूमर कमी होण्यास आणि ट्यूमरची वाढ थांबण्यासही टोमॅटोची मदत होते