Eat pulses from tomorrow

उद्यापासूनच  आहारात घ्या मोड आलेले कडधान्ये

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यचा वापर करणे खूप आवश्यक आहे. कडधान्ये जर आहारात वापरली नाहीत तर मात्र आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कडधान्ये हि आपल्याला प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करतात. लहान मुलांना तर दररोज काही ना काही प्रमाणात कडधान्ये याचा वापर केला पाहिजे.

मोड आलेल्या कडधान्ये याचा वापर आहारात केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत तर होतेच तसेच आपल्याला खूप जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. कडधान्ये हि लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी जास्त लाभकारी आहेत. ज्या महिलांना केसाच्या समस्या या जाणवत असतील तर अश्या वेळी केसांना मजबूत बनवण्यासाठी आपल्या आहारात कडधान्ये याचा वापर हा केला गेला पाहिजे. कडधान्ये याच्या साहयाने आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम वाढण्यास मदत होते.

वजन कमी करायचे असेल तर अश्या वेळीआपल्या आहारात कडधान्ये याचा वापर करावा . कडधान्ये हे डाएट करण्यासाठी जास्त करून वापरले जातात. कडधान्ये जर आहारात ठेवली तर मात्र आपल्याला भूक जास्त लागत नाही. त्यामुळे आपले वज न योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते. आपल्या त्वचेला तजेला बनवण्यासाठी सुद्धा आहारात योग्य प्रमाणात कडधान्ये याचा वापर हा केला जावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *