| |

तुपात भाजलेला बाभळीचा डिंक खा आणि निरोगी आयुष्य जगा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बाभूळ हे झाड असे आहे जे कोठेही अगदी सहज तुम्हाला दिसू शकते. हे झाड पाहिलं तर ते काही फायद्याचे असेल असे वाटत नाही पण मुळात हे झाड अत्यंत आरोग्यवर्धक आहे. होय. बाभूळ झाडाचे अनेको आरोग्यासाठी फायदे होतात. तुम्हाला माहित असेलच कि बाभूळाच्या झाडाच्या खोडातून बाहेर येणारा द्रव हा कालांतरानं कोरडा होत जातो आणि एखाद्या खडयासारखे रूप धारण करतो. या खड्यासारख्या दिसणाऱ्या पदार्थाला डिंक म्हणून ओळखले जाते आणि याचे जर दररोज सेवन केले तर अनेको लाभ मिळतात. हा डिंक आपल्या शरीराचे सर्व रोपगांपासून संरक्षण करतो. यासाठी तो कसा खायचा हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि हे आम्ही तुम्हाला सांगू. इतकेच काय तर दीनखाचे आरोग्यवर्धक फायदे देखील सांगू. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० बाभूळ डिंकाचे सेवन करण्याची योग्य पद्धत
– बाभूळाचा डिंक तूपात भाजून घ्या आणि मगच त्याचे सेवन करा. यामुळे आरोग्याला योग्य ते फायदे होतात.
यासाठी १ चमचा शुद्ध देशी तूप घ्या आणि हलके गरम करा. आता यात १ चमचा बाभूळचा डिंक घाला आणि चांगला तळून घ्या. हा डिंक भाजल्यानंतर याचे दुधासह सेवन करता येईल. यासाठी भाजलेले डिंक दळून याची बारीक पावडर बनवा आणि या पावडरचा १ चमचा १ ग्लास दुधामध्ये मिसळा. या मिश्रणाचे दिवसातून एकदा सेवन करा.

० बाभूळ डिंकाचे फायदे

१) अशक्तपणा दूर होईल – ज्या लोकांचे शरीर कमकुवत आहे आणि अशक्तपणा जाणवतोय अश्या लोकांनी तूपात बाभूळ डिंक भाजून घ्यावा आणि याचे सेवन करावे. यामुळे शारीरिक कमकुवतपणा दूर होईल आणि ऊर्जा टिकून राहील. जिममध्ये जाणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक फायदा होईल.

२) निरोगी हृदय – दररोज देशी तूपात भाजलेला डिंक खाल्ल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यामुळे उच्च रक्तदाब बरा होतो. परिणामी यामुळे हृदय विकारांपासून संरक्षण होते.

३) मधुमेहींसाठी फायदेशीर – बाभूळ डिंक खाल्ल्याने शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळते. यामुळे भूक वाढत नाही आणि पचनशक्ती मजबूत होते. ज्यामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि मधुमेह टाळता येतो.

४) कर्करोगाचा धोका टाळतो – तुपात भाजलेला बाभूळ डिंक खाल्ल्यास कर्करोग होण्यापासून मुक्त रॅडिकल्सच्या शरीरावर आराम मिळतो. बाभूळ डिंक अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांसह समृद्ध आहे. जे बॅक्टेरिया नष्ट करून कर्करोगाचा धोका कमी करते आणि शरीरातील कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाहीत.

५) खोकला सर्दी गायब – बदलत्या हवामानामुले सर्दी आणि खोकला होतो. तो टाळण्यासाठी तुपात बाभूळ डिंक भाजून खा. त्याचा प्रभाव उबदार आहे आणि यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. परिणामी खोकला आणि सर्दी बरी होते. याशिवाय रोज तुपात बाभूळ डिंक भाजून खाल्ल्यास प्रतिकारशक्ती देखील वाढते.

६) पोटाच्या विकारांपासून संरक्षण – पोटाशी संबंधित कोणत्याही रोगापासून बाभूळ डिंक रक्षण करू शकतो. कारण हा पोषक तत्वांचा खजिना आहे. डिंक भाजल्यानंतर खाल्ल्याने पाचन शक्ती वाढते आणि पोटाच्या प्रत्येक आजारापासून बचाव होतो. तसेच पोटाच्या अल्सरचा धोकाही कमी होतो. पोटात सूज येणे, गॅस आणि अपचन दूर करण्यासाठी डिंक फायदेशीर आहे.

७) हाडांमध्ये बळकटी – हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी कॅल्शियम जरुरी आहे आणि डिंक कॅल्शियमचा खजिना आहे. जो हाडांना मजबूत बनवितो, हाडे मजबूत करण्यासाठी तुपात भाजलेला डिंक दुधात मिसळून खा. यामुळे हाडे मजबूत होतील आणि सांधेदुखीपासून आरामही मिळेल.