| |

थंडीमध्ये शरीराला उष्ण ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खालं?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळा हा हेल्दी आरोग्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. यामुळे हिवाळ्यात हिरव्या भाज्या, सॅलड आणि फळे भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात विविध प्रकारच्या ताज्या हिरव्यागार भाज्या मिळतात. अशा परिस्थितीत आपला आहार आणि आहाराचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आपल्यालाच याचा लाभ होतो. कारण थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. यासाठी हिवाळ्यात आपल्या आहारात असे काही पदार्थ असणे गरजेचे असते जे पदार्थ आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून योग्य पद्धतीने उष्णता देईल. शरीर उबदार राहावे म्हणून हिवाळ्यात गूळ आणि तीळ खा असे घरातले मोठे सांगतात वास्तविक या दोन्ही गोष्टी थंडीपासून आराम देतात. पण याशिवायदेखील अनेक असे पदार्थ आहेत जे आपली काळजी घेण्यास सक्षम आहेत. आता हे पदार्थ कोणते? तर चला जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) तीळ – हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी तिळाचे सेवन करणे फायदेशीर आहे. तीळ हे पांढरे आणि काळे दोन रंगाचे असतात. या दोन्ही रंगाच्या तिळाचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळे थंडीत काळे किंवा पांढरे कोणत्याही रंगाचे तीळ खाणे फायदेशीर आहे. शिवाय तिळात मोनो – सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि अँटी बॅक्टेरियल खनिजे असतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

२) शेंगदाणे – शेंगदाणे मुळातच गुणधर्माने उष्ण आहेत. यामुळे हिवाळ्यात शेंगदाणे अगदी सहज मिळतात. शेंगदाण्याच्या प्रथिने, हेल्दी फॅटस यांसह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. तसेच शेंगदाण्यात मॅंगनीज, व्हिटॅमिन ई, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमदेखील असते. म्हणून शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते.

३) गूळ – हिवाळ्यात गूळ खाणे फायदेशीर आहे. कारण गूळ खाणे पोट आणि शरीरासाठी लाभदायक ठरते. यामुळे मेटाबॉलिज्म चांगले राहते. पचनासाठीही फायदा होतो. शिवाय गूळामध्ये लोह असते, ज्यामुळे अॅनिमियासारख्या समस्या कमी होण्यातही गूळ खाणे फायदेशीर आहे.

४) खजूर – हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए आणि बी मुबलक प्रमाणात मिळते. शिवाय खजूर हे मुळापासूनच उष्ण असल्याने थंडीत आराम मिळतो. यामुळे शरीर आतून उबदार राहते आणि थंडीचा तर जाणवत नाही. शिवाय खजूरात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर देखील चांगले असते. हे शरीराला फायदेशीर ठरते.

५) गाजर – हिवाळ्यात गाजराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते. हृदय, मेंदू, मज्जातंतू आणि एकूणच आरोग्यासाठीही गाजर फायदेशीर आहे. गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी आणि के आढळते. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.