| | | |

झोंबणाऱ्या थंडीने केली दांडी गुल्ल? मग ‘हे’ पदार्थ खा आणि एनर्जेटिक व्हा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याचा मध्यान्ह म्हणजे कडाक्याची थंडी. साधारणपणे हिवाळ्याच्या हंगामात वातावरण अतिशय थंड असते. पण मध्यान्हातील थंडी असह्य होऊ शकते यात काहीच वाद नाही. जसे कि आता हिवाळ्याचा मध्यान्ह असल्यामुळॆ सूर्य उगवला काय आणि सूर्यास्त झाला काय? थंडी अख्खा दिवस आणि अख्खी रात्र वाजते. शिवाय राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसात मध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आणखीच झोंबणार झालं आहे. त्यामुळे अशावेळी स्वत:ची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शरीराचे बाहेरून संरक्षण करायचे असेल तर स्वेटर,जॅकेट किंवा शाल यांपैकी कोणतेही गरम कपडे फायदेशीर आहेत. मात्र श्र्रीयचे आतून संरक्षण करायचे असेल तर उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. आता हे पदार्थ कोणते जे खाल्ल्याने शरीराला उष्णता देखील मिळेल आणि शरीराचे नुकसान होणार नाही. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) शेंगदाणे – शेंगदाणे गुणधर्माने उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाणे खाणे कधीही उत्तम. शिवाय शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असते. त्यामुळे शरिरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. कारण शेंगदाणे खाल्ल्याने शरिरातील उष्णता वाढते आणि थंडीपासून शरीराचा बचाव होतो. यासाठी तुम्ही भाजलेले शेंगदाणे किंवा कोणत्याही भाजीत शेंगदाणे वा कुट घालू शकता.

२) आलं – आल्यामध्ये शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे सर्व आवश्यक गुणधर्म असतात. यामुळे थंडीमध्ये आलं घातलेला गरमा गरम चहा दिवसात एकवेळ पिणे फायदेशीर आहे. यामुळे थंडी अशी चुटकीत पळून जाईल आणि तुम्हाला हायसे वाटेल. शिवाय जेवणातही आल्याचा समावेश करणे फायदेशीर आहे.

३) हळद – आयुर्वेदात हळदीचे महत्व मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलेले आहे. हळदीचे गुणधर्म आरोग्यासाठी कसे लाभदायी आहेत हे देखील आयुर्वेदात सांगितलेले आहे. हळद हा उष्णता निर्माण करणारा पदार्थ आहे. त्यामुळे हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करायचे असेल तर हळदीचे सेवन करणे कधीही फायदेशीर. यासाठी दररोज रात्री एक ग्लास गरम दुधात हळद टाकून प्या. यामुळे थंडी पळून जाईलच शिवाय रोग प्रतिकार शक्तीदेखील वाढेल.

४) हिरवी मिरची – हिरवी मिरची आपल्याला किती तिखट पचेल याच हिशोबाने खा. पण खा जरूर. कारण चवीला तिखट असली तरी यातील अनेक गुण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीतील व्हिटामिन सी, ई आणि फायबर, एंटी ऑक्सिडेंट घटक शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. श्वीय थंडीपासून रक्षण देखील करतात.

५) कांदा – कांद्यामध्ये आढळणारे अनेक पोषक तत्व थंडीपासून आपल्या शरीराचे रक्षण करतात. तसेच कांदा खाल्ल्याने जखमा देखील लवकर भरतात आणि थंडीत झालेली जखम ओढली जाते ज्यामुळे त्रास होतो यावरही कांदा गुणकारी आहे.

६) गुळ – गुळातील उष्ण गुणधर्म शरीराला आतून उष्ण ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणून थंडीच्या दिवसात गुळाचा खडा किंवा आल्यासोबत गूळ मिसळून चहा बनवून पिणे कधीही फायदेशीर मानले जाते.

७) लसूण – लसूण देखील उष्ण असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात लसणीचे सूप खाणे अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय लसणीतील गुणधर्म शरीराचे रोगांपासून देखील रक्षण करते.