| |

एकच फळ करी असंख्य रोगांना दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लहान मुलांना आवडणाऱ्या तुटीसारखे दिसणारे काफल हे फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे हे फळ अनेको औषधी बनवण्यासाठी वापरले जाते. या फळामध्ये पोटाशी संबंधित मोठमोठे आजार पळवून लावणारे गुणधर्म आहेत. शिवाय या फळत बहुतेक जीवनसत्त्वे यांसह लोह समृद्ध प्रमाणात आढळते. इतकेच नव्हे, तर या फळात अँटी ऑक्सिडंट्ससुद्धा भरपूर असतात. काफलची चव थोडी आंबट गोड असते. या फळाचा रस पचनाशी संबंधित सर्व रोग बरे करण्यास सक्षम आहे.

काफलमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक घटक समाविष्ट आहेत. जसे की, मायरीसेटिन, मायरिसिट्रिन आणि ग्लाइकोसाइड्स, फ्लाव्हन -4 आणि हायड्रॉक्सी -3. यांमुळे काफल शारीरिक अशक्तपणा, दमा, ब्रोकायटीस, सर्दी, अतिसार, ताप, मूत्राशय रोग आणि यकृतसंबंधित रोग बरे करण्यासाठी खाण्याचा सल्ला दिला जातो. इतकेच नव्हे तर हे फळ कर्करोगासारखे धोकादायक रोगदेखील दूर करते. चला तर जाणून घेऊयात काफलचे सेवन केल्यास कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात ते खालीलप्रमाणे:-

१) हे फळ पाचक रसांनी भरलेले आहे. यामुळे पोटाशी संबंधित अनेक रोग सुधारण्याचे गुणधर्म या फळत समाविष्ट आहे. म्हणून काफल खाल्ल्यास पोटाचे विकार दूर होण्यास मदत मिळते. यात प्रामुख्याने अतिसार, अल्सर, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लता यासारख्या आजारांचा समावेश आहे.

२) काफल हे फळ मानसिक आजारांसह अनेक प्रकारच्या आजारांसाठी उपयुक्त आहे. कारण या फळात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-डिप्रेससेंट घटक समाविष्ट आहेत. त्यामुळे या फळाची पाने आणि अगदी देठसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत. यामुळे दमा, अतिसार, ताप, टायफॉइड, पेचिश आणि फुफ्फुसाच्या आजारावर नियंत्रण मिळवून मात करता येते.

३) काफलच्या झाडाची साल आणि इतर औषधी वनस्पतींसह काफल्दी पावडरमध्ये आंब्याचा रस आणि मध घालून एकत्रित करून त्याचे सेवन केल्यास घश्याचा आजार, खोकला आणि दमा या आजारांपासून मुक्तता मिळते.

४) काफलच्या फुलाचे तेल कानातील संसर्ग, कर्णदुखी, अतिसार आणि अर्धांगवायूमध्ये फायदेशीर मानले जाते. यासाठी त्याचे तेल वापरले जाते.

५) काफल फळ खाल्ल्यास मानसिक ताण आणि शारीरिक वेदना दूर होतात.

६) काफलच्या झाडाची साल उगाळून कपाळावर लावल्यास सर्दी, नेत्र रोग आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.