Veggies
| | |

‘या’ भाज्या खाणारं, तो स्वस्थ राहणार, मस्त जगणार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आरोग्यासाठी काय करायचं? हा सर्वसाधारण प्रश्न आहे जो हमखास सगळ्यांनाच पडतो. पण याच उत्तर शोधण्याचा उत्साह फार काळ टिकत नाही. कारण हेल्दी राहायच्या नादात आपण अश्या बऱ्याच गोष्टी करतो ज्यांचा आपल्या शारीरिक आरोग्याला त्रास होतो. यामध्ये प्रामुख्याने कडक डाएट आणि अति व्यायाम याचा समावेश आहे. आपल्या आहार आणि विहारामुळे आपले आरोग्य कसे असेल ते ठरते. यासाठी उत्तम आणि सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. पण उत्तम आणि सकस आहार म्हणजे काय? तर मित्रांनो असा आहार म्हणजे तुमच्या दैनंदिन आहारात प्रत्येक पोषक घटकाचा समावेश असणे. कारण शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्वे मिळाली तर शरीर बाहेरून आणि आतून सुदृढ तसेच निरोगी राखण्यास सहाय्य होते.

अनेक लोक सांगतात कि, केवळ मांसाहार केल्यानेच शरीराला प्रोटीन मिळते. पण असा समज निव्वळ मूर्खपणा आहे. कारण अशा अनेक भाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने शरीराला उत्तम प्रतीचे प्रोटीन आणि याशिवाय प्रथिने, जीवनसत्व तसेच अन्य पोषक घटक मिळतात. पण अनेकांना या भाज्यांबाबत माहित नसते. परिणामी आहारातून या भाज्या सर्रास वगळल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या भाज्यांविषयी सांगणार आहोत. ज्या खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी आणि भरघोस आयुष्य जगण्यास प्रोत्साहन मिळेल. जाणून घ्या खालील फोटोंच्या माध्यमातून:-

वर सांगितलेल्या भाज्या या अगदी बारा महिने कोणत्याही बाजारात उपलब्ध असतात. शिवाय या भाज्या चवीला उत्तम आणि बनविण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यामुळे डाएट जरी सुरु असेल तरीही या भाज्या बिंधास्त खा आणि जरूर खा. कारण उत्तम आरोग्य जगण्याची गुरुकिल्ली!