| | |

वजन कमी करण्यासाठी या पिठाची चपाती खा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपलं वजन वाढतंय म्हटल्यावर हे वजन आपल्यासाठी मोठा काळजीचा विषय होऊन बसते. मग आपण आपल्या खाण्यापिण्यावर असे रोख लावतो जणू खाण्यावर कर्फ्यूच. यात सगळ्यात आधी भात आणि चपाती टार्गेट होत. पण मित्रांनो आपण जर हे पदार्थ आहारातून पूर्णच वगळले तर शरीराला त्यातून मिळणारे आवश्यक पोषक घटक कसे मिळतील? याचा विचार केलाय का कधी? आपण हे पदार्थ खाणे बंद करण्यापेक्षा त्यातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जे तुम्ही अगदी सहज आणि सोप्प्या पद्धतीने करू शकता. होय. तुम्ही तुमच्या आहारातील चपाती आरोग्यदायी करूच शकता. तुमची चपाती फायबर समृद्ध आणि कमी कॅलरीयुक्त असेल याची काळजी कशी घ्यायची ते आम्ही तुम्हाला सांगू. पण त्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा लागेल.

सहसा आपण गव्हाच्या पिठाची चपाती खातो आणि यामुळे कुठेतरी वजन वाढवण्यासाठी हि चपाती जबाबदार ठरते. पण जेव्हा प्रश्न वजन कमी करण्याचा येतो तेव्हा विशिष्ट प्रकारच्या पिठापासून बनवलेल्या चपातीचे निवड करणे योग्य ठरते. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे पीठ उपलब्ध आहे ज्यापासून बनवलेली चपाती आपल्याला वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. चला तर जाणून घेऊयात या पिठांविषयी –

१) बाजरीचे पीठ – बाजरीची भाकरी अनेकदा थंडीच्या दिवसात खाल्ली जाते. पण ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी बाजरी एकदम बेस्ट पर्याय आहे. कारण बाजरी पारंपारिक ग्लूटेन मुक्त अन्न आहे. यात प्रथिने, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोहसारख्या पोषक घटकांचा समृद्ध समावेश असतो. यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि इतर कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. परिणामी तुमचे वजन वाढत नाही.

२) नाचणी आणि गव्हाचे पीठ – नाचणी ग्लूटेनमुक्त आहे. शिवाय यात फायबर आणि अमीनो अॅसिड समृद्ध आहे. यामुळे नाचणीचे पीठ भूक कमी करण्यास तसेच पारंपरिक पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतात. तज्ञ सांगतात, नाचणी लठ्ठपणा कमी करते, ऊर्जा देते, पचन सुधारते आणि हृदयविकाराच्या दीर्घ आजारांपासून देखील प्रतिबंध करते.

३) ज्वारी आणि गव्हाचे पीठ – ज्वारी ग्लूटेनमुक्त आहे. शिवाय यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे वजन कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. तसेच ज्वारीचे पौष्टिक गुणधर्म पचन सुधारण्यास मदत करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करतात.

४) बदामाचे पीठ – बदामाचे पीठ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण गव्हाच्या पिठाच्या तुलनेत यात कर्बोदक खूप कमी आहेत. प्रथिने, निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ई यांचे प्रमाण मात्र यात खूप आहे. शिवाय बदामाचे पीठ ग्लूटेन मुक्त आहे. तसेच या पिठात मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. बदामाच्या पिठात फायटिक एसिड खूप कमी प्रमाणात आढळते. यामुळे बदामाच्या पिठापासून बनवलेली भाकरी पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे.