| | |

‘हे’ पदार्थ खा आणि दीर्घायुषी व्हा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगात प्रत्येकालाच दीर्घायुषी व्हावं असं वाटत असतं. पण दे हरी खाटल्यावरी असं करून कसं चालेल. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आयुष्यमानाचा ऱ्हास होताना दिसत आहे. सतत बसून काम, व्यायमाचा अभाव, फास्ट फूडचे अत्यंत सेवन, कोल्ड्रिंकचे अतिरिक्त सेवन यामुळे माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. त्यात आपल्याला असं वाटतं कि काहीही न करता आपल्याला निरोगी आयुष्य मिळायला हवं. तर हे कसं शक्य आहे? तर यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलायला हव्या. होय. कारण अयोग्य गोष्टींचे सेवन आयुष्याचा ऱ्हास पण योग्य गोष्टींचे सेवन आरोग्य हमखास. म्हणून आम्ही तुम्हाला आज अश्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने तुम्ही निरोगी, स्वस्थ आणि सुदृढ रहालं. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) कच्ची केळी – कच्च्या केळ्यात प्रिबायोटिक तत्व असते. यामुळे पोटाचे कोणतेही अगदी तीव्र विकार कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात राखण्यासदेखील कच्ची केली सहाय्यक आहेत. यासह कच्ची केळी खाल्ल्याने किडनीच्या कर्करोगाचा धोकादेखील ५०% कमी होतो.

२) डाळिंब – डाळिंबात व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अन्य प्रकारचे मिनरल्स भरपूर प्रमाणमत असतात. शिवाय डाळिंबामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर प्रॉपर्टीजही समाविष्ट असतात. एका अभ्यासानुसार, डाळिंब शरिरातील माइटोकांड्रिका मांसपेशींना कमकुवत पडू देत नाही. तसेच यामुळे ताजेतवाने वाटते आणि रक्ताभिसरणही व्यवस्थित होते.

३) कच्चा मध – नैसर्गिक रुपातील साखर म्हणजे मध. या मधामध्ये असणारी अनेक पोषणमुल्य कर्करोग आणि ह्रदयाशी निगडीत रोगांचा धोका कमी करतात. इतकेच काय तर एका संशोधनात सिद्ध झाले आहे कि, यकृत, कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगांमध्ये कच्च मध उपयुक्त आहे. तर ट्यूमर आणि कर्करोगांच्या पेशींसाठी मध हाय सायटोटॉक्सिक म्हणून काम करते आणि सामान्य पेशींवर नॉन-सायटोटॉक्सिक म्हणून काम करते. जे शरीरासाठी लाभदायक आहे.

४) शेळीच्या दुधापासून बनवलेले केफिर – आजकाल बदलती जीवनशैलीमुळे कर्करोग्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परंतु शेळीच्या दुधापासून बनवण्यात आलेल्या केफिरमध्ये असणारे प्रोबायोटिक्स हे तत्व प्रतिकारक शक्ती दुरुस्त करण्याचे आणि कर्करोगातील ट्यूमरला प्रतिबंध करण्याचे काम करते. एका संशोधनानुसार, केफिरच्या सेवनामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका ५६% कमी होतो. यामुळे कर्करोगापासून बचावासाठी शेळीच्या दुधापासून बनवलेले केफिर आहारात समाविष्ट करा. (केफिर- दह्यासारखा पदार्थ जो दुधापासून बनवला जातो.)

५) आंबवलेले पदार्थ – आंबवलेले पदार्थ मेटाबॉलिक रेट बदलू शकतात. अर्थात हे पदार्थ आपल्या शरीराची पचनक्रियेची क्षमता वाढवतात वा दुरुस्त करण्यास सहाय्य करतात. यातील प्रोबायोटिक्स, अँटीऑक्सिडंट आणि अँटीमाक्रोबियल प्रॉपर्टीज वय आणि दीर्घायुष्यासंबंधी समस्यांचा नाश करतात. त्यामुळे आहारात इडली, डोसा, उत्तपा असे आंबवलेले पदार्थ समाविष्ट करा.