| |

हिवाळ्यात उकडलेले शिंगाडे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिवाळ्याचा मध्यान्ह असल्यामुळे सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवते आहे. अश्या वातावरणात ना धड भूक लागते ना तहान. पण आरोग्याची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे योग्य आहार. त्यामुळे आरोग्याची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये आणि थंडीपासून आपला बचाव व्हावा म्हणून खाण्या-पिण्यामध्ये हलके बदल करणे गरजेचे आहे. या हंगामाचे एक वैशिष्ट्य असे कि, थंडीमध्ये आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी जाणवल्या तर थंडीतच उपलब्ध होणारी फळे आणि भाज्या यावर प्रभावी ठरतात. जसे कि, थंडीमध्ये बाजारात हमखास उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे शिंगाडा. अनेकांना या भाजीबद्दल माहित नसेल तर चला या भाजीविषयी जाणून घेऊ आणि सोबत त्याचे फायदे काय आहेत तेदेखील पाहू.

– शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी आहे. यामुळे तिला ‘वॉटर चेस्‍टनट’ असेही म्हणतात. अगदी एखाद्या फळासारखी दिसणारी हि भाजी पावसाळ्यात उगवते आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात विक्रीसाठी येते. हि भाजी आरोग्यासाठी अतिशय लाभदायी मानली जाते. कारण शिंगाड्यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रथिने, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 तसेच रिबोफ्लेविनसारख्या पोषक तत्वांचा समावेश जास्त आढळतो. शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते जे पोट भरण्यासाठी उपयुक्त ठरते. जाणून घ्या फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकार शक्तीत वाढ – शिंगाड्यातील पोषक घटक संसर्गांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करणाऱ्या रोग प्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात. यामुळे विविध आजारांपासून शरीराचे रक्षण होते.

२) घशाच्या समस्या दूर – शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे घशाच्या अनेक समस्या दूर होतात. शिवाय घसा खवखवणे यापासूनही सुटका मिळते.

३) पोटासाठी फायदेशीर – शिंगाड्यातील फायबर आपल्या पोटाच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचनसारख्या समस्या दूर होतात.

४) मुळव्याधीपासून सुटका – मूळव्याध हा आजार अत्यंत वेदनादायी असतो. तुम्हालाही हा त्रास असल्यास उकडलेले शिंगाडे खाणे फायदेशीर आहे.

५) निद्रानाशावर फायदेशीर – एखाद्याला निद्रानाशाचा त्रास असेल तर त्याने उकडलेले शिंगाडे खाणे कधीही फायदेशीर. कारण या समस्येवर मात करण्यासाठी शिंगाडं फायदेशीर आहे.

६) पायाच्या तळव्यांचे संरक्षण – थंडीमध्ये पायाच्या तळव्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. टाचा झिजणे, भेगा पडणे, जखमा होणे अश्या समस्यांवर शिंगाडा फायदेशीर आहे. यासाठी दररोज २ उकडलेले शिंगाडा खा.

७) वजनावर नियंत्रण – शिंगाडा खाल्ल्यामुळे पोट लवकर आणि जास्त काळ भरलेले राहते. परिणामी अन्य काहीही अरबट चरबट खाण्याची इच्छा होत नाही. म्हणून वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर शिंगाडा जरूर खा.