Bread Causes Cancer
| | |

दररोज ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो .. ?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नेमकं नाश्त्याच्या वेळी जर घरात काहीच उपलब्ध नसेल तर सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात काय विचार येतो..? पटकन ब्रेड आणून चहा – बटर सोबत खाऊन पटकन कामावर धूम ठोकावी. हो ना..? त्यामुळे ब्रेड खाणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. याचे पहिले कारण नाश्ता बनवायचा वेळ वाचतो आणि भूक शांत होते. पण आता आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती जाणून घेतल्यानंतर कदाचित तुम्ही पुन्हा ब्रेड खाताना कमीत कमी शंभर वेळा विचार कराल. एका संशोधनानुसार, दररोज ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो. होय. तुम्ही बरोबर वाचताय. ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरमेंट या संस्थेने दररोज ब्रेड खाणा-यांना कॅन्सर हा अत्यंत घातक आजार होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच या संस्थेने ब्रेड आणि पिझ्झामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे कॅन्सर होतो, असा दावा केला आहे. काही कंपन्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या ब्रेडचे नमुने या संस्थेने तपासले होते. दरम्यान यात समाविष्ट असलेले पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट हे धोकादायक रासायनिक घटक आहे आणि यामुळे कॅन्सर होऊ शकतो, असे निकषात आढळले. पोटॅशियम ब्रोमेटच्या आणि पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉईडसंबंधित अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे या दोन्ही रासायनिक घटकांच्या वापरामूळे ब्रेड खाणे धोकादायक ठरू शकते.

सीएसईच्या पोल्युशन मॉनिटरिंग लॅबोरेटरीच्या अहवालावर अनेक जण सांगतात कि, ब्रेड गहू आणि मैद्यापासून तयार होतो. मग कसा काय कॅन्सर होऊ शकतो? तर यावर संस्थेने उत्तर दिले आहे कि, मैदा किंवा गहूच्या पीठाने कॅन्सर होत नाही. तर ब्रेड बनविण्यासाठी वापरण्यात येणा-या हानिकारक केमिकल्सचे अति सेवन केल्यामुळे संबंधित व्यक्तीस कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो.

महत्वाचे :- या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी एकदा डॉक्टर वा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ‘हॅलो आरोग्य’ घेत नाही.