| | |

कोबीची भाजी खाल्ल्याने मेंदूचे नुकसान होते?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोबीची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण कोबी खाल्ल्यामुळे अल्सर, मोतीबिंदू, पचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास सहाय्यक आहे. तसेच कोबीमध्ये सल्फोराफेन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे कोबीचे सेवन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. तर कोबीविषयी सांगताना आहार तज्ञांनी एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा म्हणजे, कोबी खाल्ल्यामुळे थेट मेंदूचे नुकसान होते. होय. एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डाएटिशियन अनु सिन्हा यांनी हा खुलासा करत म्हटले आहे कि, कोबीच्या भाजीमध्ये असलेले टेपवर्म म्हणजेच एक अळी व्यक्तीच्या मेंदूला हानी पोहोचवते.

० कोबीतील टेपवर्म माणसाच्या मेंदूला नुकसान कसे पोहचवते?
– कोबीमध्ये टेपवर्म्स म्हणजेच अळ्या आढळतात. ज्या खाल्ल्या गेल्या तर मेंदूपर्यंत पोहोचतात. हे किटाणू मानवी शरीराच्या आतड्यांची त्वचा ओलांडतात आणि मुख्य रक्तप्रवाहात पोहोचतात. यानंतर शरीरात असणा-या ब्लड ब्रेन बॅरियरला ब्रेक करून मेंदूपर्यंत पोहोचतात. यामुळे आपल्या मेंदूला सूज येते. शिवाय डोकेदुखी आणि ब्रेन फॉगसारख्या समस्या होतात.

० कसा कराल बचाव?
– या संदर्भात दुसऱ्या काही तज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि, कोबी खाल्ल्याने टेपवर्म होत नाहीत. कारण, हे किटाणू वा कृमी कोबीच्या पानांच्या आत लपलेले असतात. म्हणून संसर्ग टाळण्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी कोबी पूर्णपणे स्वच्छ धुणे महत्वाचे आहे. ही भाजी गरम पाण्याने धुऊन वा ५-१० मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्या आणि मग खा. कारण असं केल्यामुळे भाजीच्या आत लपलेले कीटाणू सहज बाहेर येतात आणि मरतात. यामुळे असे केल्यास कोबी खाल्ल्याने आरोग्याला फारसे नुकसान होणार नाही.

० खाण्याआधी घ्या काळजी
– कोणत्याही भाज्या असो त्या बनवण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात नीट धुवून घ्या.
– शिवाय भाजी चिरताना भाजीचा दर्जा योग्य आहे की नाही हे सुद्धा तपासा.
– जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची सवयी अंगवळणी लावा.

० कोबीची भाजी खाण्याचे फायदे

१) कोबीच्या भाजीत बरेच पौष्टिक आणि शरीरासाठी आवश्यक असे तत्व आहेत. यामुळे कोबी सॅलडमध्ये किंवा शिजवून खाल्ल्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. परिणामी पचनशक्ती मजबूत होते.

२) दररोज कोबी खाण्यामूळे आतड्यांमधील सूज कमी होते. शिवाय पोटदुखीच्या समस्यांवर त्वरित आराम मिळण्यासाठी मदत होते.

३) सांध्यांना सूज आली असेल तर त्या ठिकाणी कोबीची पाने गरम करून बांधा. यामुळे अगदी काहीच वेळात दुखणाऱ्या सांध्याला आराम मिळतो.

४) बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोबी खाणे लाभदायक आहे. यासाठी कोबी किसून त्यावर थोडे मीठ, काळी मिरी व लिंबू पिळून खा. यामुळे पचन व्यवस्थित होते आणि पोट साफ होण्यास मदत होते.

५) गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी महिलांनी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. पण कोबीची भाजी आवडत नसेल तर जेवल्यानंतर किमान कोबीचा अर्धा ग्लास रस थोडंसं लिंबू पिळून प्यावा.

६) कोबी खाल्ल्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात. यामुळे ज्या लोकांना डोळ्याच्या तक्रारी आहेत त्यांनी कोबी खाणे फायदेशीर ठरते. यामुळे दृष्टी सुधार होतो.