| |

काजू खाल्ल्याने हृदय राहील ठणठणीत; कसे..? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। काजू हा असा ड्रायफ्रुटचा प्रकार आहे जो खायला जवळजवळ सगळयांनाच आवडतो. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच काजू आवडीने खातात. काजूचा वापर हा विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. बहुतांशी काजूचा वापर हा मिठाई बनविण्यासाठी होतो. चवीशिवाय काजू हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे. कारण काजूमध्ये समाविष्ट असलेले पोषक घटक हे शरीरासाठी लाभदायी भूमिका दर्शविते.

काजूमध्ये प्रथिने, फायबर, झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स या सारखे पोषक घटक असतात. तसेच काजूमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. यामुळे काजूचे सेवन निरोगी आणि पौष्टिक आहार म्हणून मानले जाते. याशिवाय काजूमध्ये कॉपरचा देखील समावेश असतो. यामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती आणि बुद्धीच्या विकासासाठी काजू फायदेशीर ठरतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काजूचे नियमित सेवन करणे हृदयासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. कारण यामुळे हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. चला तर जाणून घेऊ काजूचे इतर फायदे खालीलप्रमाणे:-

० काजूचे आरोग्यदायी फायदे

Heart Care

१) हृदयरोगाचा धोका कमी
काजूचे नियमित सेवन केल्याने हृदयाला लाभ होतो. कारण काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसेच काजूमध्ये अँटी इंफ्लेमेटरी घटकांसह जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे देखील असतात. यामुळे हृदय तंदुरुस्त राहते.

Diabetes

२) मधुमेहावर नियंत्रण
काजूमध्ये नट्सच्या तुलनेत कार्बोहायड्रेट कमी असते. शिवाय काजू फायबरने समृद्ध असल्यामुळे मधुमेहाची लक्षणं कमी होतात. शिवाय काजू रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे मधुमेहींसाठी काजू फायदेशीर आहे.

३) डोळ्याच्या समस्यांमध्ये उपयुक्त
काजूतील ल्युटिन आणि झेंथिन यामुळे डोळ्यातील पडदे सुरक्षित राहतात. त्यामुळे डोळ्याच्या समस्यांमध्ये काजू खाणे फायदेशीर आहे. तसेच काजूतील अनेक घटक हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात.

४) कोलेस्टेरॉलवर मात
शरीरातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमूळे हृदयाचे आजार होतात. यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. अशावेळी काजूचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय काजूमध्ये असलेले स्टीरिक अ‍ॅसिड रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते.

Weight Loss

५) वजन कमी होते
काजूतील फायबर आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड पचनसंस्था सुधारते. यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काजू हा अतिशय फायदेशीर पदार्थ आहे.