| |

खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आणि पोषक आधार अत्यंत गरजेच्या असतो. पण आहार म्हणजे नुसतं डाळ, भात, भाजी, आमटी इतकेच नव्हे तर आहारात प्रथिने, कर्बोदके आणि खनिजयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे असते. तसेच चांगल्या आरोग्यासाठी गोड फळे आणि सुका मेवासुद्धा फायद्याचा असतो. मुख्य म्हणजे सुका मेव्यातील खजूर हे खूपच चांगले. इतर ऋतुंपेक्षा थंडीत खजूर तसेच खारीक खाणे फायद्याचे असते. कारण, खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शिवाय यात ऊर्जा, साखर, आणि फायबरसह, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. चला तर जाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे-

१) मज्जासंस्था मजबूत होते.
– खजूर मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करते. त्यातील जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थेचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते. इतकेच नव्हे तर खजूरमधील पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते. खजूर खाल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.

२) पचन प्रकिया नीट राहते.
– सुकवलेले खजूर अर्थात खारीक रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्याने ते आरोग्यास फायदाच होतो. शिवाय भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घेऊन, थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या आणि प्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते. परिणामी पचनक्रिया सुरळीत आणि नीट राहते.

३) सर्दीपासून आराम.
– सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये वेलची पूड टाकून प्यावे. यामुळे सर्दी लवकर बरी होते.

४) हृदयविकाराचा धोका कमी होतो.
– शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होते. कारण खजूर ऊर्जा आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. शिवाय खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाही किंबहुना होण्याचा धोका अत्यंत कमी होतो.

४) हाडांचे आरोग्य सुधारते.
– खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे सर्व घटक खजुरात असल्यामुळे हाडांची चांगली वाढ होते. त्यामुळे पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खजूर परिणामी ठरतो किंवा खारकेची पूड दुधासह घेण्यानेही फायदा होतो.

५) गर्भास लाभदायक.
– खजूर तसेच खारीकमध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे त्याचा लाभ गर्भाला होत असतो. गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होण्यासाठी खजूर मदत करते. तर बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्रावाला प्रतिबंध होण्यासही मदत होते. गरोदरपणी खजूर खाल्ल्यास आईला चांगले दूध सुटते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण प्राप्त होत असते.

६) त्वचा उजळण्यास मदत होते.
– खजूर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. शिवाय खारीकमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी समाविष्ट असतात. त्यामुळे आहारात खजूर वा खारका असतील तर त्वचेला कोणतीही हानी होत नाही. तसेच अकाली म्हातारपण येत नाही.