| | |

भोपळ्याच्या ताज्या बिया खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भोपळा हि एक अशी भाजी आहे जिचा गर आणि बिया दोन्ही खाणे फायदेशीर आहे. भोपळा हा पाणीयुक्त असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी भोपळा खाणे फायदेशीर ठरते. भोपळ्याचा वापर प्रामुख्याने भाजी, सूप, सांबार, हलवा आणि अश्या अनेक विविध प्रांतातील विविध अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय भोपळ्याच्या बियांचा वापर शारीरिक आरोग्यासह, त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रामुख्याने भोपळ्याच्या बिया सुकवून त्याचा सुक्या मेव्यामध्ये समावेश होतो. भोपळ्यांच्या बियांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जी अन्य कोणत्याही बियांमध्ये आढळून येत नाहीत. चला तर फार लांब लचक प्रस्तावना न करता थेट जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकार क्षमतेत वाढ – भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते.

२) पांढऱ्या पेशींत वाढ – भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते आणि यासह पेशी सक्रिय होतात. यामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि संसर्गापासून संरक्षण होते.

३) रक्तदाबावर नियंत्रण – भोपळ्याच्या बियांमध्ये पोटॅशियम असते. यामुळं;ए भोपळ्याच्या बिया खाल्लयने ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते. परिणामी हृद्यदेखील निरोगी राहते.

४) मधुमेहींसाठी फायदेशीर – भोपळ्याच्या बिया इन्सुलिनची मात्र संतुलित करण्याचे काम सक्षमरित्या करतात. यामुळे रक्तातील साखर वाढली वा कमी झाली तर त्यासाठी भोपळ्याच्या बिया प्रभावी काम करतात. म्हणून नियमित डाएटमध्ये भोपळ्यांच्या बियांचे जरूर सेवन करा.

५) श्वसनबाधा दूर – भोपळ्याच्या बिया शरीरातील ऑक्सिजनचा फ्लो वाढवतात. परिणामी श्वसन मार्गातील बाधा दूर होण्यास मदत होते.

६) डोळ्याचे निरोगी आरोग्य – टरबुजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटिन हि तत्वे समाविष्ट असतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

७) अॅसिडिटीच्या त्रासावर प्रभावी – ज्या लोकांना वारंवार काहीही खाल्ले तरी अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यांनी भोपळ्याच्या बिया खाणे फायदेशीर आहे.

८) पुरुषांसाठी फायदेशीर – भोपळ्याच्या बियांमध्ये मिनरल आणि झिंक ही तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. हीच तत्त्वे पुरुषांमध्ये हार्मोन्स वाढवण्याचे काम करतात.

९) निरोगी नखे आणि केस – टरबुजाच्या बियांमध्ये असणारे प्रोटीनचे प्रमाण हे अधिक असते. ज्यामुळे या प्रोटीनचा फायदा नखे आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी होतो.

१०) ताण तणावावर प्रभावी – भोपळ्याच्या बियांमधील झिंक हे मेंदूच्या कार्यप्रणालीत सुधार करण्यास सहायक असते. यामुळे डोक्यावरील भार हलका होतो आणि परिणामी ताण तणाव दूर होतो.