| | |

जवस खाल्ल्याने शरीर मजबूत आणि सौंदर्याला बहार येते; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आंतरीक आणि बाह्य सौंदर्य यांमध्ये बाह्य सौंदर्य लोकांना अधिक भाळते हे आपण सारेच जाणतो. कारण आपणही बाह्य सौंदर्यावर खूप मेहनत करतो. मग शरीर यष्टीसाठी जिम करणे, त्वचेसाठी ब्यूटी क्रिम आणि विविध थेरेपी वापरणे, असे बरेच काही ना काही उद्योग आपण करतो. पण एवढ्यासाठी केवढं कराल? म्हणून आम्ही तुमच्यासाठी पर्याय घेऊन आलो आहोत. तो ही साधा सोप्पा आणि सरळ. तुम्हाला जवस माहित आहेत? होय. होय. जवस. हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होतेच शिवाय सौंदर्य अगदी खुलून येते. आता तुम्ही म्हणाल ते कसं बरं? तर त्याच उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा लागेल. जाणून घ्या खालीलप्रमाणे –

१) आपल्या आहारामध्ये जवस असतील तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला आणि त्वचेला होत असतात. कारण जवस नियमीत खाल्ल्याने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहतात.

२) स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग होतो.

३) उपाशीपोटी ४ चमचे जवस खाल्ल्यास त्वचा तजेलदार दिसते आणि मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते.

– चेहऱ्यावर काळे डाग असतील तर २ दिवसातून किमान एकदा जवस खावे.

-जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल.

– पाठदुखी होत असेल तर जवस कपड्यात बांधून ठेवा. त्यामुळे नसा मोकळ्या होतात आणि पाठदुखी दूर होते.

– जवस खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. शिवाय पित्ताचा त्रास होत नाही.

– आहारात जवस असल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया चांगली राहते.

– दाताच्या हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.