| |

तापात मटकी खाणे पथ्यकर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांच्या आहारात मटकीची उसळ, मिसळ, कोरडी भाजी, आमटी, सॅलड असे पदार्थ आपण पाहतो. हि मटकी केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी खाणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आहारात मटकीचा समावेश करायला हवा. मटकीत जलांश १०.८%, प्रथिने २३.६%, वसा (स्निग्ध पदार्थ) १.१%, तंतू ४.५% व इतर कार्बोहायड्रेटे ५३.५% आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. याशिवाय कॅरोटीन, थायमीन, रिबोफ्लाविन, निॲकसीन आणि क ही जीवनसत्त्वेदेखील समाविष्ट असतात. तर मोड आलेल्या मटकीमध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. कारण मटकीची मुळे मादक असतात. परिणामी ज्वरात अर्थात तापामध्ये मटकी पथ्यकर आहे. मटकी वाजीकर (कामोत्तेजक), पित्तविकाररोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहे. यामुळे मटकी खाणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक म्हटले जाते. चला तर जाणून घेऊयात मटकी खाण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

१) शारीरिक ऊर्जा – सर्दी, पडसं, कफ यांपैकी कोणत्याही आजारांसह ज्वरात अर्थात तापामध्ये मटकी आणि मटकी उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. यासाठी शिजवलेली मटकी थोडीशी हळद घालून खावी. तर मटकीचे पाणी चवीसाठी थोडे मीठ घालून प्यावे. यामुळे शरीरात ऊर्जा राहते.

२) हृदय विकारांपासून संरक्षण – मटकीतील पोटॅशियममूळे शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे हृदय विकारांची शक्यता कमी होते.

३) अॅनिमियापासून सुटका – मटकी लोहयुक्त असते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अश्या व्यक्तींनी मटकी जरूर खावी. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि यासोबत अॅनिमियापासून संरक्षण देखील मिळते.

४) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ – मटकीमध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते. झिंकच्या सहाय्याने शरीराची रोगप्रतिकराक शक्ती वाढते. यामुळे आहारात मालकीचा समावेश केल्यास रोगप्रतिकार क्षमता वाढते.

५) मधुमेहावर परिणामकारक – रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखायचे असेल तर यासाठी मटकीचा आहारात समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा अधिक लाभ मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांना होतो.

६) पोटाच्या समस्यांवर प्रभावी – मटकीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, ज्यांच्या सहाय्याने खाल्लेले अन्न पचण्यासाठी मदत होते. शिवाय मटकीमध्ये फायबरचे प्रमाण मुबलकल असल्यामुळे अपचन आणि मलावरोध या समस्या दूर होतात.

७) वाढत्या वजनावर नियंत्रण – मोड आलेल्या मटकीमध्ये कॅलरीज कमी असतात पण शरीरासाठी आवश्यक पोषण तत्त्व अधिक असतात. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर मोड आलेली मटकी नियमितपणे खा.

८) केस आणि त्वचेसाठी फायदेशीर – मोड आलेल्या मटकीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केस आणि त्वचा सुंदर राहण्यास मदत होते.