| | |

मोड आलेले कच्चे मूग खाणे शरीरासाठी पोषक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मोड आलेले कच्चे मूग आजकाल अनेक लोक नाश्ता म्हणून खातात. हा काय ट्रेंड नव्हे तर हे आरोग्य आहे. होय कारण खरंच मोड आलेले मूग खाणे शरीरासाठी लाभदायक आहेत. कारण मोड आलेले मूग फायबरचा मुख्य स्रोत असतात. ज्यामुळे पोट लवकर भरते आणि भूकही लवकर लागत नाही. शिवाय डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा खूप फायदा होतो. मुगात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्कृष्ट असा फायबरचा स्रोत आहे. यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होते. याशिवाय मुगामध्ये अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा – 3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम, फोलिक अॅसिड आणि विटामिन बी – 6 चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे एक सुपरफूड आहे असे म्हणायला हरकत नाही. चला तर जाणून घेऊयात कच्चे मूग खाणे शरीरासाठी इतर कोणकोणत्या पद्धतीने फायदेशीर आहेत ते खालीलप्रमाणे:-

१) शरीरासाठी पोषक – दैनंदिन जीवनात विटामिन्सची गरज पूर्ण करण्यासाठी कच्चे आणि मोड आलेले मूग फायदेशीर असतात. कारण मुगामध्ये असणारे विटामिन सी संक्रमण आणि आजाराशी लढण्यासाठी आपल्या शारीरिक प्रतिकारशक्तीत वाढ करतात. साधारण एक कप कच्च्या मोड आलेल्या मूगामध्ये १४मि.ग्रॅ. विटामिन सी असते. शिवाय यामध्ये ग्लोब्युलिन आणि एल्बुमिन प्रोटीनही असते. जे हाडे, मांसपेशी आणि त्वचेला अधिक मजबूती देण्यास मदत करतात.

२) पचनक्रियेसाठी उपयोगी – कच्च्या मोड आलेल्या मूगात एंजाईमो अधिक असते. हे एंजाईम चयापचय क्रियेला मदत करते आणि शरीरातील रासायनिक प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे जेव्हा पचनक्रियेचा विषय येतो तेव्हा कच्चे मूग नियमित डाएटमध्ये समाविष्ट करून घेणे फायद्याचे ठरते. यामुळे पचनक्रियेबाबत असणाऱ्या समस्या दूर होतात.

३) बद्धकोष्ठतेवर परिणामकारक – कच्च्या मोड आलेल्या मूगामध्ये अधिक डाएटरी फायबर आढळते. त्यामुळे पचनक्रिया नियंत्रित करण्यासाठी याचा पुरेपूर उपयोग होतो. विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी आपल्या जेवणात कच्च्या मोड आलेल्या मूगाचा समावेश केल्यास बराच फायदा मिळतो. शिवाय यामुळे मलत्याग प्रक्रिया अधिक सोपी होते.

४) कोलेस्ट्रॉल कमी होते – कच्च्या मोड आलेल्या मुगात असणारे पोषक तत्व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतात. शिवाय यातील फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, ओमेगा – 3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिड हे पोषक तत्व लिपीड प्रोफाईल बनविण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यासाठी मदत करतात. तर फायबर मधुमेहास प्रतिबंधित करतात. त्यामुळे मधुमेह मेलिटस, हायपोग्लायसिमिया आणि इन्शुलिन पीडित व्यक्तींनी मोड आलेल्या कच्च्या मुगाचा डाएटमध्ये समावेश करणे लाभदायी मानले जाते.

५) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर – वजन कमी करण्यासाठी कच्चे मोड आलेले मूग खाणे हा अत्यंत चांगला पर्याय आहे. कारण हे शरीराला पोषक असून यामध्ये कोणतीही कॅलरी नसते. त्यामुळे तुम्ही याचे नियमित सेवन करू शकता. शिवाय यात फायबर अधिक असल्याने लवकर भूक लागत नाही आणि भूकेसाठी जबाबदार असणाऱ्या हार्मोन घ्रेलिनचा स्राव रोखण्यासही मदत होते. त्यामुळे मेंदूला भूकेचे संकेत बऱ्याच काळापासून देणे बंद होते. सतत भूक लागून न खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.

६) एनिमियावर रोख – एनिमियासारखे आजार रोखण्यास मोड आलेले कच्चे मूग मदतयुक्त ठरतात. मोड आलेले मूग हे लोहयुक्त खनिजांनी युक्त असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे खनिज व्यवस्थित मिळते आणि एनिमियावर रोख लागतो. शिवाय पोटाची समस्या, मळमळणे, चक्कर येणे आणि थकवा अशी लक्षणे असतील तर मुगाचे सेवन शरीराला अधिक फायदा देतात.