| | |

‘आवरा जिभेला, सावरा आरोग्याला’; जाणून घ्या चमचमीत खाण्याचे तोटे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सतत चमचमीत, चटपटीत, मसालेदार, तेलकट, तुपकट, आंबट आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अगदी तुमच्या आमच्यातही अश्या खाण्यापिण्याचा शौक हा असतोच. त्यामुळे मी नाही असे म्हणूच नका. जेव्हा जेव्हा जिभेला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तेव्हा तेव्हा आपण आपल्या आरोग्याचे स्वतःच्या हातून नुकसान करतो. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अश्या पदार्थांमध्ये तेल आणि विविध मसाल्याची मात्रा सर्वात जास्त असते. जे शरीरात फॅटी अ‍ॅसिड्स वाढवतात. यासोबत लठ्ठपणा, हृदयाचे आजार, पोटाचे आजार आणि लिव्हरच्या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तुम्हाला कितीही पटत नसलं तरीही हेच खरं आहे. म्हणून उत्तम आरोग्यासाठी आताच सुधरा नाहीतर आयुष्यभर रोगांच्या साथीने जगावे लागेल. चला तर जाणून घेऊयात जिभेचे चोचले पुरवण्याचे तोटे खालीलप्रमाणे:-

१) असुरक्षित हृदय – जिभेला आवडेल असे तेलकट, तिखट खाल्ल्याने ट्रान्स फॅट वाढते. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवते आणि यामुळे ब्लड प्रेशर प्रभावित होते. परिणामी हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. यामुळे वजन वाढते, डायबिटीज असंतुलित होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

२) शरीरातील गुड बॅक्टेरियावर प्रभाव – जास्त प्रमाणात तेलकट, तिखट खाल्ल्याने शरीरातील गुड बॅक्टेरियाचे नुकसान होते. परिणामी हे आतड्यातील मायक्रोबायोम खराब करते. यामुळे अपचन आणि पोटाच्या समस्या होतात.

३) पोटाच्या तक्रारी – तेलकट आणि मसालेदार पदार्थ अतिसाराची समस्या निर्माण करतात. शिवाय मसाल्यातील कॅप्साईसिन पोटाच्या थराचे नुकसान करते. परिणामी जळजळ, मळमळ, उलटी, पोटदुखी, तिखट ढेकर येण्याची समस्या निर्माण होते आणि पोटाचे कार्य बिघडते.

४) गॅसची समस्या – तिखट आणि तेलकट पदार्थांमुळे शरीराचा पीएच बॅलन्स खराब होतो. पीएच लेव्हल हि अ‍ॅसिडिक आणि बेसिक सुद्धा असते. यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पित्त आणि अ‍ॅसिड वाढते. परिणामी शरीरात अ‍ॅसिडिक समस्या होतात. जसे कि – छातीत जळजळ, गॅस आणि पोटफुगी.

५) लिव्हरची समस्या – अति तेलकट तिखट पदार्थांमुळे लिव्हर खराब होऊ शकते. कारण मसालेदार पदार्थाचे तेल लिव्हरला चिकटते आणि फॅट तयार करते. यामुळे लिव्हर खराब होते आणि यामुळे सिरोसिसची समस्या होऊ शकते. शिवाय काविळ होण्याचीदेखील शक्यता असते.

६) अल्सरचा त्रास – अन्न पदार्थातील कॅप्साइसिन पोटातील अ‍ॅसिडचे प्रॉडक्शन वाढवते. यामुळे गॅस्ट्रिक अल्सर आणि पेप्टिक अल्सर होऊ शकतो. याशिवाय आतड्याचा कोलायटीस आजारदेखील होऊ शकतो.

७) लठ्ठपणा – लठ्ठपणाची प्रमुख कारणे म्हणजे ट्रान्स फॅट, अनहेल्दी फॅट आणि मेटाबोलिज्म संथ होणे. आपण खात असलेले पदार्थ अति तेलकट आणि मसालेदार असतील तर तेलकट, तिखट खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

८) गर्भवती वा स्तनदा मातांसाठी हानिकारक – गर्भवती व स्तनदा महिलांसाठी तेलकट, तिखट जेवण त्यांच्या आणि बाळांच्या आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण अश्या आहारामुळे पॉट बिघडते. गॅसची समस्या वाढते आणि महिलांमध्ये दुधाच्या दर्जावर याचा प्रभाव पडतो.

९) अनिद्रेचा त्रास – रात्री तेलकट आणि तिखट आहार केल्याने झोप खराब होते. परिणामी गॅस, अपचन, सुस्ती या समस्या होतात.

१०) त्वचेचे नुकसान – तेलकट, तिखट आहाराचा प्रभाव चेहऱ्यावरही होतो. यामुळे त्वचा तेलकट होते. शिवाय हार्मोनल असंतुलन होते. परिणामी अ‍ॅक्ने आणि पिंपल्सची समस्या वाढते.