| | |

ऑईली फूड खाल्ल्याने चेहरा होतो खराब?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आपल्या आरोग्याची हानी करतात हे खरं आहे. पण काय खरंच आपण खात असलेल्या पदार्थांमुळे आपल्या त्वचेवर परिणाम होतो? तर याच उत्तर हो आहे. पण त्वचेबद्दल फारच आग्रही असलेल्या लोकांमधून काही प्रश्न वारंवार विचारले जातात. जसे कि जंक फूड किंवा ऑईली फूड खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स येतात आणि चेहरा खराब होतो का? तर याविषयी आज आम्ही तुम्हाला तज्ञांनी दिलेली माहिती देणार आहोत. पण कदाचित हि माहिती वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

असे म्हणतात कि, चांगला आहार असेल तर त्वचा उत्तम राहते. शिवाय आहारात रक्तपुरवठा करणारे घटक असतील तर त्वचा तजेलदार आणि चांगली राहते. इतकच काय तर, भरपूर फायबरयुक्त पदार्थ खाल्ले की त्वचा चांगली राहते. असे अनेकदा अनेकजणांकडून तुम्ही ऐकले असेल. पण त्वचेवर पिंपल्स आणण्यासाठी आपण खात असलेले तेलकट पदार्थ कारणीभूत असतात का? याविषयी तज्ञ काही वेगळाच सांगतात. काय? चला जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

० तेलकट पदार्थांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊन चेहरा खराब होतो का?
– या प्रश्नाचे उत्तर तज्ञांच्या मते नाही असे आहे. तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पिंपल्स येत नाहीत, असेच डॉक्टरदेखील सांगतात. असे म्हटले जाते की, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स येतात आणि चेहरा खराबी होतो. असे पदार्थ खाल्ल्याने शरीरात अधिक तेल जाते आणि तेलाचे अतिसेवन केल्यामुळे त्वचेवरील पोअर्समध्ये तेल साचून पिंपल्स येतात. पण प्रत्यक्षात पिंपल्स आणि तेलकट पदार्थ यांचा काहीही संबंध नाही असे खुद्द डॉक्टर्स सांगतात. तेलकट पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आणि शरीरासाठी काहीही फायद्याचे नसतात. पण त्यामुळे पिंपल्स मुळीच येत नाही. मग तुम्ही म्हणाल पिंपल्स का येतात? ते हि जाणून घेऊयात.

० पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे

१) अस्वच्छता हे पिंपल्स येण्याचे मूळ कारण आहे. त्यामुळे त्वचेची स्वच्छता राखत नसाल तर तुम्हाला हमखास पिंपल्स येतात.
२) हार्मोन्समध्ये होणारे बदल हेसुद्धा पिंपल्स येण्यामागील मूळ कारण आहे. त्यामुळे शरीरात अगदी जरासा बदल झाला तरीही पिंपल्स येतात.
३) फायबरयुक्त पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात न केल्यासही चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात.
४) मासिक पाळीच्या तारखा पुढेमागे झाल्यामूळेदेखील पिंपल्स येतात.
५) एखाद्या औषधांचे सेवन केल्यास ते उष्ण पडले तरीही पिंपल्स येतात.
६) ताणतणाव हेदेखील पिंपल्स येण्याचे मुख्य कारण असू शकते.