| | |

रोज एक अंडे अश्या पद्धतीने खाल, तर होईल आरोग्यास लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंड्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रथिने उपलब्ध असतात. त्यामुळे अंडे प्रथिनांचा मोठा स्रोत म्हणून ओळखले जाते. शिवाय अंड्यामध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल, फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी ५, व्हिटॅमीन बी ६, व्हिटॅमीन बी १२, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन के हे पोषक घटक समाविष्ट असतात. त्यामुळे आहारतज्ञ दररोज १ अंडं खाण्याचा सल्ला देतात. शिवाय अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि आरोग्यही निरोगी राहते. मात्र याकरिता अंड्याचे मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नयेत. तर उकडलेले अंड खाणे फायद्याचे ठरते. चला तर जाणून घेऊयात दररोज एक उकडलेले अंड खाल्ल्याने आरोग्याला कोणते लाभ होतात. खालीलप्रमाणे:-

१) अंड प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. तसेच यामध्ये व्हिटॅमीन इ देखील असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उकडलेले अंडे फायदेशीर मानले जाते. जिममध्ये मेहनत करणारेसुद्धा उकडलेल्या अंड्यांचा डाएटमध्ये समावेश करतात.

२) उकडलेले अंड डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कारण यामध्ये ग्लूटन नावाचा घटक असतो. जो डोळ्यांच्या समस्यांवर मत करण्यात फायद्याचे असतो. शिवाय चांगल्या त्वचेसाठी देखील उकडलेलं अंडं खाणे फायदेशीर असते.

३) एका संशोधनानुसार, पुरुषांमध्ये शुक्राणूंचा दर्जा सुधारण्यासाठी अंड फायदेशीर असते. कोलेस्ट्रॉल बॅलेन्स करणारे फोस्फेटाइट्स आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड अंड्यामध्ये असते. जे बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण करते. मात्र ऑम्लेट खाल्ल्याने त्यात वापरलेल्या तेलामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढते.

४) सकाळी उकडलेलं अंड खाल्याने दिवसभर उत्साह कायम राहतो. यासाठी अंड्यामध्ये असणारे प्रोटीन फायदेशीर ठरते.

५) अंड्यामध्ये कोलाइन नावाचं एन्जाइम असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते. ज्यांना स्मृतीभ्रंश हा त्रास आहे त्यांनी दररोज १ उकडलेलं अंड सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्याने त्यांच्या शरीरातील कोलाइनची कमतरता दूर होते. परिणामी मेंदूला चालना आणि गती प्राप्त होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *