Papaya
| | |

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास आतड्यांच्या समस्या होतील दूर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आरोग्यासाठी फळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे हे तुम्ही ऐकले असालच. म्हणूनच तर आजारपणात कुणी भेटायला आलं कि हमखास फळ घेऊन येतात. पण पपई हे एक असे फळ आहे जे नियमित सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर ते पोटातील विश्वरी पदार्थ पाचन तंत्रातून बाहेर काढून टाकते.

एवढेच नाही तर त्यात पाचक एन्झाईम्स भरपूर असतात. ज्यामुळे मल त्याग म्हणजेच शौच नियमित आणि साफ होते. यामुळे पोटफुगी, पोटात गॅस निर्माण होणे, पोटात वेदना होणे अश्या कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी पपई खाण्याचे इतर काही आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

Heart Care
१) हृदय निरोगी आणि मजबूत होते - पपईतील फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे हृदयाचे कोणत्याही विकारांपासून संरक्षण करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय पपईत पोटॅशियमसह जीवनसत्त्वे बी, सी, ई, बीटा-कॅरोटीन आणि लाइकोपीन सारखे पोषक तत्व असतात. जे रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्टॉल काढून हृदयाचे आरोग्य टिकवते.
२) कॅन्सरचा धोका कमी होतो - कर्करोगाची मुख्य कारणे फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हि आहेत. यासाठी अँटिऑक्सिडंटसमृद्ध पपई खाणे फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होत नाही आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. शिवाय पपईत लाइकोपीन हा कॅरोटीनॉइडचा प्रकार असतो ज्यामध्ये कर्करोगविरोधी गणधर्म असतात.
Diabetes
३) मधुमेहावर अत्यंत प्रभावी काम करते - मधुमेहींनी नियमित सकाळी रिकाम्या पोटी १ कप पपई खाल्ल्यास यातील अँटी ऑक्सिडंट गुणधर्म शुगर कंट्रोल करतात. याचा शरीरावर हायपोग्लाइसेमिक प्रभाव असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
Weight Loss
४) कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते - निमित्त सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते आणि यातील फायबर शरीरातून कमी घनतेचे लिपोप्रोटीन काढून टाकण्यास मदत करते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलसोबत वजनदेखील कमी  होईल. 
Digestion
५) चयापचय क्रिया सुरळीत होते - निमित्त सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पाचन तंत्र सुधारते आणि अन्न जलद चयापचय करण्यास मदत होते. पपईतील पपेन एंझाइम पोटात गेलेले अन्न लवकर तोडण्यास मदत करते. शिवाय पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा धोका टळतो.