| |

असे शेंगदाणे खा आणि मिळवा आरोग्यवर्धक लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण जे अन्न खातो ते अत्यंत प्रभावीरीत्या आपल्या शरीरावर परिणाम करीत असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आपला आहार संतुलित आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असायला हवा याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्याला शेंगदाणे लाभदायक ठरतात. पण शेंगदाणे कसे खायचे हे माहित असेल तर आरोग्यासाठी फायदे मिळवता येतात. मुळात स्वादिष्ट आणि निरोगी गुणांनी परिपूर्ण असण्याबरोबरच शेंगदाणे अनेक आरोग्यवर्धक फायदे देणारे असतात. काही लोकांना शेंगदाणे इतके आवडतात कि ते कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतात. पण मित्रांनो शेंगदाण्यात असणारे पौष्टिक सत्त्व आणि प्रथिने शरीराच्या विकासासाठी मिळवायची असतील तर शेंगदाणे भिजवून खाणे फायद्याचे ठरते. होय कारण भिजवलेले शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम फायदे देऊ शकतात.

१) उतार वयात विस्मरणाची समस्या सतावते. यासाठी भिजवलेले शेंगदाणे नक्की खा. कारण भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपला मेंदू सुरक्षित राहतो आणि एकाग्रतेत वाढ होते. परिणामी स्मरणशक्ती वाढते.

२) पोटाची कोणतीही समस्या असो त्यावर भिजवलेले शेंगदाणे खाणे अतिशय लाभदायक आहेत. पोटफुगी, ऍसिडिटी, पचनसमस्या असेल तर भिजवलेले शेंगदाणे साधारण १ मूठ दररोज रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. यामुळे फायदा होईल.

३) पाठ आणि सांधेदुखीने त्रस्त असाल तर भिजवलेले शेंगदाणे जरूर खा. यामुळे सांधे मोकळे होतात आणि दुखणे कमी होते. फक्त भिजवलेले शेंगदाणे गुळासह खायला विसरू नका.

४) भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास शरीरात रक्त परिसंचरण सुधारते. यामुळे शरीरात उबदारपणा येतो आणि यामुळे रक्त परिसंचरण योग्य राहते. शिवाय हृदय रोगाचा धोका देखील कमी होतो.

५) सतत खोकल्याचा त्रास होत असेल तर भिजवलेले शेंगदाणे आरामदायी उपाय आहेत. यासाठी मूठभर भिजवलेले शेंगदाणे दिवसभरात दोन भागात खा.

६) भिजवलेले शेंगदाणे सेवन केल्याने शारीरिक ऊर्जा प्राप्त होते. यामुळे संपूर्ण दिवस उत्साही आणि ऊर्जात्मक जातो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *