Pickle
| |

काय सांगता ..? चमचमीत लोणचं खाल्ल्याने इम्युनिटी वाढते..?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डाळ भात असो किंवा नुसता मसाले भात सोबत जर मस्त चमचमीत लोणचं असेल तर क्या बात है..? हो कि नाही. पण कितीतरी लोक फॅट वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने लोणचं खाणं टाळतात. पण लोणचं जितकं चविष्ट तितकंच आरोग्यदायी आहे. अगदी भाज्या आणि फळांप्रमाणेच लोणचं वजन न वाढवतासुद्धा भरपूर पोषण देते. कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि चरबीचे प्रमाण कमी असते. म्हणूनच लोणचं खाल्ल्याने आरोग्याचं नुकसान तर होत नाही पण फायदे मात्र होतात. त्यात जे लोक नियमित लोणचं खातात त्यांची प्रकृती उत्तम राहते. याची काही प्रमुख करणे आपण आज जाणून घेणार आहोत.

लोणचं खाण्याचे फायदे :-

१. रोग प्रतिकारशक्ती वाढते - आवळ्याचं लोणच असेल तर ते अतिशय आरोग्यदायी आणि इम्युनिटी वाढवणारा उत्तम    पर्याय आहे. कारण आवळा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. शिवाय यातील करक्युमिन नावाचे अद्भूत रसायन शरीराला संक्रमण आणि विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्यास मदत करते. यामुळे लिव्हर, हृदय आणि किडनी या अवयवांचे कार्य सुरळीत चालते.
२. पचनक्रिया सुधारते - आपले शरीर नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक बॅक्टेरिया तयार करते. यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे विघटन करण्यास मदत होते. मात्र जंक फूड आणि फास्ट फूडच्या अति सेवनामुळे हळूहळू या नैसर्गिक आणि उपयुक्त जीवाणूंचे प्रमाण कमी होत आहे. नैसर्गिक फर्मेंटेशन वापरून बनवलेले लोणचे अशा जीवाणूंच्या वाढीस मदत करते आणि यामुळे पचनक्रिया सुधारते.
३. जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त लोणचे - मेथी आणि कढीपत्ता सारख्या भाज्या तसेच हिरव्या पालेभाज्या लोणच्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. यातील जीवनसत्त्वे अ, क, के आणि बरेच व्हिटॅमिन्स शरीराला मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच पोटॅशियम, लोह, कॅल्शियम इत्यादी खनिजांसह सूक्ष्म पोषक घटकांनी देखील लोणचे समृद्ध असते आणि अँटि ऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे. ज्यामुळे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.