| | |

हिवाळ्यात कच्चा मुळा खालं तर ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर तुमच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असायलाच हवा. यामध्ये काही पालेभाज्या तर काही कंदमुळे आणि कडधान्यांचाही समावेश असायला हवा. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि या दिवसांत भूकेवर नियंत्रण राहत नाही . यामुळे आपल्या आहारात अनेक अश्या पदार्थांचा समावेश होतो. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असेलच असे नाही. यामुळे आरोग्याचे पुरते नुकसान होते. तसेच खाण्यापिण्यात चुकीचे पदार्थ असल्यास ब्लड प्रेशरवर याचा गंभीर परिणाम होतो. यासाठी आहारात मुळा समाविष्ट करावा. यामुळे काय होते? तर रक्तदाबाच्या रुग्णांनी मुळा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होतेच. शिवाय रक्तवाहिन्यांना फायदा होतो. मुख्य म्हणजे मुळा तुम्ही कच्चा खाल्ल्यास अधिक लाभदायक ठरेल. चला तर जाणून घेऊयात मुळा खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते – मुळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कारण मुळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे संसर्गजन्य खोकला आणि सर्दीची समस्या होत नाही. तसेच मुळा खाल्ल्याने सूज आणि जळजळ होण्याची समस्या कमी होते. म्हणून हिवाळ्यात प्रामुख्याने मुळा खाणे फायदेशीर ठरते.

२) मेटाबॉलिज्म – मुळा खाल्ल्याने पोट निरोगी राहते. तसेच मुळ्याच्या सेवनाने पचनक्रियाही मजबूत होते. यामुळे खाल्लेलं अन्न पचतं आणि आम्लपित्त, लठ्ठपणा, जठरासंबंधी समस्या व मळमळ यासारख्या समस्या मुळ्याच्या सेवनाने दूर होतात.

३) हृदय निरोगी राहते – मुळा खाल्ल्याने हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. तसेच मुळा खाल्ल्यामूळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि व्यवस्थित काम करू लागते. याचे कारण म्हणजे मुळ्यामध्ये अँथोसायनिन्स असतात. हा घटक हृदयासाठी चांगला असतो. मुळा मध्ये फॉलिक ऍसिड आणि फ्लेव्होनॉइड्स देखील चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.

४) रक्तदाबावर नियंत्रण – रक्तदाबावर नियंत्रण मिळवायचा असेल मुळा खाणे लाभदायक आहे. कारण, मुळ्यात पोटॅशियम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. म्हणूनच उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने मुळा जरूर खावा असे डॉक्टर सांगतात.

५) रक्तवाहिन्या मजबूत – मुळ्यात कोलेजेन भरपूर आढळते. ज्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होण्यास मदत होते. तसेच मुळा एथेरोस्क्लेरोसिस सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करतो. परिणामी रक्तवाहिन्यांचे नुकसान होत नाही.