| |

लाल पेरू खाणे आरोग्यासाठी लाभदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पेरू हे आपल्या देशातील एक प्रमुख आणि खूप सहज मिळणारे फळ आहे. शिवाय पेरू अनेकांचे आवडते फळ आहे. असे फार क्वचितच लोक असतील ज्यांना पेरू खाणे फारसे आवडत नाही. पेरू बाहेरून हिरव्या रंगाचा आणि आतून पांढऱ्या किंवा लाल रंगाचा असतो. यातील लाल रंगाचा पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतो. तसेच पेरूमध्ये छोट्या छोट्या शेकडो बिया असतात.

अनेक लोक आपापल्या घराबाहेरील कुंपणातही पेरूची झाडे लावतात. त्यामुळे गावी गेल्यावर पेरू तोडून खाण्याची मजा त्यांना अनुभवायला मिळते. मुळात लाल पेरूची चव थोडी तुरट आणि गोड अशी असते. यामुळे अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत सारेजण त्याचे सेवन करू शकतात. तसेच पेरूला थोडे मीठ आणि लाल मिरची पावडर लावली तर .. आहा क्या बात है! असं तोंडातून निघाल्याशिवाय राहणार नाही. असा हा पेरू जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय आरोग्याचीही काळजी घेतो. कशी ते जाणून घ्या.

१) रोगप्रतिकारक क्षमता- पेरू हे खूप सहजासहजी मिळणारे फळ आहे. पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन आणि खनिज शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासूम वाचवण्यास मदत मिळते. सोबतच पेरू आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत करतात. डॉक्टर सुद्धा नेहमी पेरू खाण्याचा सल्ला देतात.

२) दृष्टी दोष – आजच्या काळात कॉम्पुटरचा उपयोग खूप जास्त वाढला आहे. त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर सर्वात जास्त होतो. त्यामुळे डोळ्यांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. नजर चांगली ठेवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन A ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन Aसाठी पेरू हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. पेरू खाल्याने तुमची नजर चांगली राहील.

३) रातांधळेपणा – व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. मात्र पेरू नियमित खाल्याने रातांधळेपणा होण्याची शक्यता कमी होते. वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्यादेखील पेरू खाल्याने कमी होतात. तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, डोळ्यांची नजर चांगली ठेवण्यासाठी पेरू किंवा पेरुचं ज्यूस अवश्य घ्यावे.

४) पचन समस्या – काळ्या मिठासोबत पेरू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. परिणामी पचनाच्या समस्या दूर होतात. प्रामुख्याने अनेकदा लहान मुलांच्या पोटात जंत होतात. त्यासाठीही पेरू उत्तम फळ आहे.

५) डार्क सर्कल – पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायचे आणि ते पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायचे. यामुळे डोळ्यांचा खाली असणारे काळे डाग व सूज कमी होते.

६) बद्धकोष्ठता – बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे फायद्याचे ठरते.

७) तोंडाची दुर्गंधी – जर तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पानं चावून चघळणे फायदेशीर ठरते. यामुळे तोंडातील दुर्गंधी सुद्धा दूर होते आणि दातांमध्ये त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो.