strawberry
| | |

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वजन कमी होते..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रामुख्याने थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे स्ट्रॉबेरी हे फळ दिसायला जितके आकर्षक चवीला तितकेच स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी तेव्हढेच फायदेशीर आहे. चवीला आंबट गोड असणारे स्ट्रॉबेरी हे फळ रंगाने लालबुंद आणि अतिशय रसाळ असते. त्यामुळे अगदी लहान मुले देखील हे फळ आवडीने खातात.

दरम्यान अनेक लोक जे आपल्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय सतर्क असतात ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी आहारात स्ट्रॉबेरीचे सेवन करतात. अनेकांना याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत कि खरंच स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे वजन कमी होते..? त्यांच्या याच प्रश्नाचे आज आम्ही या लेखातून उत्तर देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात याबाबत आहारतज्ञ काय सांगतात.

स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंटचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यामुळे स्ट्रॉबेरी खाल्ल्याने छातीतील जळजळ कमी होते, रक्तातील साखर नियंत्रित होते, हृदयविकाराचा धोका कमी होतो असे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पण काही लोक मानतात कि स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वजन वाढते. तर काही लोक म्हणतात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वजन कमी होते. मग आता नेमकं खार काय..? हे सांगताना तज्ञांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

० काय सांगतात तज्ञ..?

तज्ञ सांगतात कि, स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्वे, शून्य कोलेस्टेरॉल, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, चरबी मुक्त आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा याशिवाय व्हिटॅमिन C च्या सर्वोत्तम स्त्रोतांचा समावेश असतो.

यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. तसेच यातील फायबरची मात्रादेखील अधिक आहे. यामुळे स्ट्रॉबेरी हे फळ वजन वाढण्यास प्रतिबंध करते आणि पचनास सहाय्य करते. एकंदरच स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वजन कमी करणे सोपे होते.

० आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश कसा करावा..?

तज्ञ सांगतात कि, स्नॅक्स म्हणून स्ट्रॉबेरी खाता येतील. शिवाय फ्रुट सॅलडमध्ये स्ट्रॉबेरीचा जास्त वापर करा. तसेच ओट्ससोबत किंवा स्मूदी वा शेकच्या रूपात स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर आहे. यामुळे लहान मुलेदेखील हसत हसत हे फळ आवडीने खातात.

स्ट्रॉबेरीचे अन्य फायदे

तज्ञ सांगतात कि, स्ट्रॉबेरी फक्त वजन कमी करत नाही. तर याशिवाय रक्तातील साखरेची पातळी कमी करते. याचा फायदा मधुमेहाच्या प्रकार २ ने ग्रासलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात होतो. तसेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठीदेखील स्ट्रॉबेरी खाणे १००% लाभदायी आहे. शिवाय स्ट्रॉबेरीमुळे पचनक्रिया सुलभ होते. तर त्वचेसाठीही स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे.