Breakfast
| | |

रिकाम्या पोटी ‘हे’ पदार्थ खाल तर आजारांना आमंत्रण द्याल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी असे अनेक जण असतील ज्यांना सकाळी उठल्या उठल्या नाश्ता करण्याची सवय असेल. आपल्यापैकी काही असेही असतील ज्यांना नाश्ता टाळायची सवय असेल. मित्रांनो रात्री किमान ८ तासाच्या झोपेनंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपली पचनसंस्था नुकतीच कार्यान्वित होत असते. ती हळूहळू सक्रिय होण्यासाठी काही वेळ लागतो. अशावेळी अचानक पचन संस्थेवर ताण येईल असे काहीही खाल्ल्याने एकतर चयापचय बिघडते. दुसरे म्हणजे आरोग्याची हानी आणि तिसरं म्हणजे अख्खा दिवस खराब जातो. त्यामुळे पोहे, उपीट, समोसे, बिस्कीट, ऑम्लेट, फ्रुट ज्यूस हे सगळं काही बाजूला ठेवा आणि तुमच्या जिभेला नाही तर पोटाला विचारा कि त्याला काय हवंय..?

कारण तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्यानंतर जवळपास २ तासांनी नाष्टा करणे कधीही चांगले. याचे कारण म्हणजे आपण जे खातो ते आपल्या शरीराची गरज असते. त्यामुळे शारीरिक गरज पूर्ण होण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काहीही खाताना किमान २ वेळा विचार करा. कारण तुम्ही निवडलेला पदार्थ चुकला तर विविध आजारांना आमंत्रण मिळू शकते. आता हे पदार्थ कोणते? तेच आपण जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

1. चहा/ कॉफी

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करणे म्हणजे या रोगांनो या असे म्हणण्यासारखे आहे. यामुळे एसिडीटी वाढू शकते. तसेच पचनतंत्रातील हायड्रोक्लोरिक एसिडचा अतिरिक्त स्त्राव होऊ शकतो. परिणामी पोटाच्या विविध तक्रारी आणि समस्यांना तोंड द्यावे लागते.

2. दही

दही आरोग्यासाठी कितीही उत्तम असले तरीही दह्यामध्ये लॅक्टिक एसिड असते. ज्यामुळे दही रिकामी पोटी खाल्ल्यास पोटातील पित्त उसळते आणि यामुळे एसिडीटीची समस्या उद्भवते. यात छातीत जळजळ, कर्पट ढेकर अश्या समस्या दिसून येतात.

3. कच्च्या भाज्या

साधारणपणे तुम्ही दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणावेळी कच्च्या भाज्या सलाड वा कोशिंबीर करून खाणे फायदेशीर आहे. मात्र रिकाम्या पोटी या भाज्या खाऊ नये. कारण कच्च्या भाज्यांमध्ये फायबर जास्त असते आणि यामुळे पचनशक्तीवर ताण पडतो. परिणामी पोटफुगी आणि पोटदुखीची समस्या उद्भवते.

4. तेलकट आणि तिखट पदार्थ

रिकाम्या पोटी कधीही तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊ नका. यामुळे पोटात जळजळ होते. परिणामी पित्ताचा त्रास वाढतो आणि डोकेदुखी होते. शिवाय यामुळे अपचनदेखील होते.

5. आंबळ फळे

कोणतेही फळ आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असते पण ते खाण्याची वेळ पाळली तर.. त्यामुळे रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. फळांमध्ये फायबर आणि फ्रक्टोजचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया मंदावते आणि परिणामी चयापचय व्यवस्थित होत नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *