| |

शेपूची भाजी खाणे निरोगी आरोग्यासाठी उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय खानपान योजनेत शेपूच्या भाजीचा वापर जिभेची चव वाढवण्यासाठी करतात. तर काही भागांमध्ये लोकं मेथीची भाजी, मुग डाळ, बटाटा, शेंगदाण्याची आमटी हे पदार्थ बनविताना त्यांची चव वाढविण्यासाठी यात शेपूच्या भाजीचा वापर करतात. शेपूची चव आणि सुगंध सर्वोत्तम तर असतोच त्याचबरोबर हि भाजी निरोगी आरोग्याचा एक उत्तम पर्याय मानली जाते. कारण यात विटामिन-सी, विटामिन-ए, आयर्न, कॅल्शियम आणि मॅंगनीज यांसारखे पोषक घटक समाविष्ट असतात. बऱ्याच ठिकाणी शेपूच्या भाजीला ‘सोआ’ म्हणून ओळखले जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि, शेपूची भाजी आरोग्याची काळजी कशी घेते तिचे फायदे काय? खालीलप्रमाणे

० शेपूच्या भाजीचे फायदे :-

१) मेटबॉलिझम मजबूत होते.
– शेपूची पाने मेटबॉलिझम बुस्ट करण्यासाठी अर्थात मजबूत करण्यासाठी सहाय्यक आहेत. हि भाजी फॅटबर्न सारखी काम करते. याची पाने आपण चहा किंवा ग्रीन टीमध्ये टाकून देखील वापरू शकतो आणि लाभ मिळवू शकतो.

२) पचन क्रिया सुरळीत होते.
– शेपु भाजीत एन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात. जे खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर या भाजीत फायबरदेखील मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच गॅस, अपचन, पोट फुगणे या समस्यादेखील दूर करते. इतकेच नव्हे तर, बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही शरीरापासून दूर राहतात.

३) हाडे मजबूत होतात
– शेपूची भाजी हाडांना मजबूत बनविण्यास मदत करते. त्यामूळे हाडे मजबूत करण्यासाठी शेपू औषधी मानली जाते. इतकेच नव्हे तर हाडांमधील वेदना कमी करण्यासाठी देखील हि भाजी उपयुक्त ठरते. त्यामुळे आपल्या आहारात शेपू असणे फायद्याचे मानले जाते.

४) निद्रानाश विकारापासून संरक्षण होते.
– शेपूच्या भाजीमध्ये फ्लेव्होनाइड्स आणि विटामिन बी हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. जे शरीरात असलेल्या कोर्टिसोलच्या मात्रेच्या कमतरतेसाठी मदत करतात. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव देखील कमी करण्यात मदत करतात.

५) वजन कमी करते.
– शेपूच्या भाजीमध्ये समृद्ध अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि मेटाबॉलिज्म बळकट करतात. त्यामुळे शेपूची भाजी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.