Nonveg
| | |

अति मांसाहार करणे आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असालं.. तर हि बातमी तुमच्याचसाठी आहे. कारण खाण्यापिण्याच्या बाबतीत काटेकोरपणा तोपर्यंतच जोपर्यंत तुमच्यासमोर तुमचे आवडते पदार्थ ठेवले जात नाहीत. त्यात जर तुम्ही खाण्यावर प्रेम करणारे असाल तर मग विषयच संपला. बहुतांश लोक शाकाहारापेक्षा मांसाहार करणे पसंत करतात. अगदी तंदूरी चिकन, मटर कोरमा, सुक्क मटण, काळ मटण, चिकन कोफ्ता, बिर्याणीचे विविध प्रकार आणि अजून बरंच काही.. आता एव्हढं सगळं फक्त वाचूनच जर तुम्हाला भूक लागली असेल तर आताच जरा सावध राहा. कारण जर तुम्हाला मांसाहार करणे जास्त आवडत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. कसे..? ते माहित नसेल तर जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० जास्त मांसाहार करण्याचे दुष्परिणाम

१) जास्त मांसाहार करणाऱ्या लोकांना पचन संबंधीत त्रास होतो. तसेच मांसाहारामुळे बॅड कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते. परिणामी वजन वाढते.

२) जे शाकाहारी आहाराला प्राधान्य देतात त्यांनी मांसाहार करू नये. कारण संबंधित व्यक्तीचे पोट, आतडे आणि यकृत मांसाहार पचण्यासाठी पुरेसे एन्झाइम तयार करू शकत नाही.

३) अति मांसाहार माणसाच्या हार्मोन्सवर परिणाम करतो. यामुळे चिडचिड वाढते. तसेच यामुळे शरीर आणि मन दोन्ही अस्वस्थ होते.

४) मांसाहारी लोकांमध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका जास्त असतो. मांसाहार जास्त केल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, किडनीचे आजार, संधिवात, अल्सर असे अनेक आजार होऊ शकतात.

टीप :- नियमित मांसाहार करण्यापेक्षा शाकाहारी जेवणासोबत समतोल राखा. ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण शाकाहारी अन्न माणसाला निरोगी आणि तंदुरुस्त बनवते. तसेच शाकाहार शरीर आणि मनाची अस्थिरता मिटवण्यास सक्षम असतात.