White Rice

जास्त भात खाल्ल्याने शरीराचे होईल नुकसान; कसे? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना आहारात भात नसेल तर जेवणाचं ताट अपूर्ण आणि आहार तोकडा वाटतो. त्यामुळे आहारात किमान वाटीभर भात खाल्ला जातोच. मुख्य म्हणजे आपल्या देशात गव्हानंतर सर्वात जास्त वापरले जाणारे धान्य म्हणून पांढऱ्या तांदळाचा उल्लेख केला जातो. याचे कारण म्हणजे पांढरा तांदूळ पिकवणाऱ्या राज्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये प्राधान्य आहार म्हणून तांदळाचा वापर केला जातो. पांढरा तांदूळ हा साधा उकड भात, बिर्याणी, पुलाव, मसाले भात अश्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि खाल्ला जातो. तसे पाहाल तर जुन्या काळाच्या गरजेनुसार भाताचे अधिक सेवन हे ठीक होते. कारण आधीची जीवनशैली हि फार वेगळी होती. त्यासमोर आजची जीवनशैली पाहता भाताचे अधिक सेवन करणे नक्कीच शरीरासाठी तथा आरोग्यासाठी हानिकारक आहे. ते कसे? हे आपण आता जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

पांढरा तांदूळ आरोग्यासाठी हानिकारक कसा.. ?

पांढरा भात हा अनेकांच्या आहाराचा अविभाज्य घटक आहे. शिवाय तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. परंतु तांदळाचे नियमित सेवन प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. कारण सध्याची जीवनशैली फारशी बरी नसल्यामुळे शुगर आणि हृदयरोग्यांची संख्या वाढली आहे. त्यामागे अधिक भात खाणे हे एक कारण आहे. भात रोज खाणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे अशी जीवनशैली असल्यास आरोग्यदायी तांदूळ आरोग्यावर वाईट परिणाम करतो. यश्वीय नियमित भात खाणारे लोक जर आधीच लठ्ठ असतील आणि त्यांना धूम्रपानाची सवय असेल तर हृदयविकार होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे भात खाण्याचे प्रमाण मर्यादित असणे अत्यंत आवश्यक आहे.
आधी झालं नाही मग आता का होईल ..?

आता हि माहिती वाचल्यानंतर अनेक तज्ञ मंडळी म्हणतील कि आम्ही जन्माला आल्यापासून तांदूळ खात आहोत पण आम्हाला अजून काही झालं नाही. मग आता थोडीच होणार आहे. जर हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, पहिली बाब म्हणजे तांदूळ प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हानिकारक नसतो. आम्ही सांगितल्याप्रमाणे, ज्या लोकांची जीवनशैली अयोग्य आहे, शिवाय ज्यांच्या शरीराची हालचाल फार कमी आहे, तसेच ज्या लोकांना धूम्रपान-   मद्यपान अश्या सवयी आहेत आणि जे लोक लठ्ठ आहेत. अशा लोकांच्या आरोग्यावर तांदूळ विपरीत परिणाम करू शकतो.
घरातील वृद्ध मंडळी पाहाल तर ती भात खाऊनही धष्ट पुष्ठ होत नाहीत; याचे कारण, 
बाळ ते तरुण गटात या व्यक्ती मैलोमैल पायी चालत असत. यश्वीय शेतीची भारी भारी कामे. अवजड सामानांची उचलं पाचलं आणि कष्टाची कामे अशी यांची दिनचर्या असल्यामुळे आता उत्तर वयात असताना देखील त्यांचे शरीर आतून भक्कम असते. यामुळे भात खाल्लयने त्यांच्या पचनक्रियेवर आणि शरीरावर कोणताही विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.