| | |

अंड्याचा रंग सांगतो आरोग्याला होणारे नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंडी हे अनेक लोकांचे आवडते खाद्य आहे. त्यात ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ हे वाक्य तर खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे अगदी लहानापासून ते वृद्धांपर्यंत सगळेच अंडी खाणे पसंत करतात. अंडी हा प्रोटिन्सचा प्रमुख स्रोत मानला जातो. त्यामुळे ते खाणे निश्चितच आरोग्यदायी आहे. मात्र दुसरीकडे पाहता अंडी खाताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आरोग्याला नुकसान देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा अंड्याचा रंग आरोग्याला नुकसानदायी असण्याचे संकेत देते. आता हा बदलता रंग किंवा खराब अंड कसं ओळखायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) खराब अंड्यांवर पांढरा आणि तंतुमय थर येतो. जो नंतर हलका तपकिरी रंगाचा होतो. याशिवाय अंड्याच्या आतील बल्क हलक्या हिरव्या रंगाचे दिसल्यास ते खाऊ नये. अश्याप्रकारे अंड्याचा पांढरा रंग बदलला असेल तर खराब असण्याची शक्यता असते.

२) अंड्याच्या पांढऱ्या भागात गुलाबी रंग दिसला तर ते अंडं लगेच फेकून द्या. अंड्याच्या सर्वसामान्य रंगात बदल होणे अर्थात अंड्यात स्युडोमोनास बॅक्टेरिया असण्याची शक्यता आहे.

३) अंड्यात तयार होणारा धोकादायक जिवाणू हा हिरवा असतो आणि पाण्यात विरघळणारा द्रव तयार करतो. त्यामुळे अंड्यामधल्या पांढऱ्या भागात काहीही फरक दिसला तर ते अंडं खाणं टाळा.

४) अंड्यात गुलाबी वा इंद्रधनुष्यासारखा थोडासा जरी रंग दिसला तरीही ते अंडं खाण्याची चूक करू नका.

० महत्वाचे

– अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ४५ अंश फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवावीत. यामुळे अंडी खराब होण्याचा धोका खूप कमी होतो.

– अंड्याचा पांढरा रंग बददल्याचे जाणवल्यास ताबडतोब ते अंडं फेकून द्यावं. हे अंडं स्युडोमोनास बॅक्टेरियाचा संसर्ग झालेलं असू शकतं. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.