| |

चवीने वांगी खाणाऱ्यांनो सावधान..अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या भारतीय आहारात भाज्यांचं स्थान फार विशेष आहे. दैनंदिन आहारात किमान एक तरी भाजी असावीच लागते. नाहीतर आपले जेवण काई पूर्ण होत नाही. अगदी जेवणाचं ताटसुद्धा कसं अपूर्ण वाटू लागतं. याशिवाय एखादा सणवार आलाच तर दोन दोन भाज्या हमखास होतात. एक सुकी आणि एक रस्सा भाजी हवीच नाही का? त्यात काही सणांची आणि सोहळ्याची तर ठरलेली भाजी सुद्धा असते. जसे कि, कुणाचं लग्न असेल आणि गावात पंगत वाढली जात असेल तर हमखास या पंगतीच्या जेवणात वांग बटाटा रस्सा भाजी अगदी भुरक्या मारून खाल्ली जाते.

आता तुम्हीच विचार करा कि, वांगी कोणाला आवडत नाहीत? मस्त चमचमीत भरलेलं वांग, भाजलेलं सुकं वांग किंवा मग रस्सा भाजी.. आ..हा..हा.. काय तोंडाला पाणी सुटलं ना? पण मित्रांनो चवीला भन्नाट असणारी वांगी आरोग्यासाठी प्रत्येकवेळी आरोग्यदायीच असतील असे नाही. खरंतर वांगी खाल्ल्याने बरेच फायदे होतात. पण ही चवदार वांगी काही लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. चला तर जाणून घेऊया वांगी खाणे कोणास वर्ज्य आहे खालीलप्रमाणे:-

१) अॅलर्जीची समस्या – अगदी कोणत्याही अॅलर्जीची समस्या असेल तर कृपया अश्या रुग्णांनी वांग्याचे सेवन प्रामुख्याने टाळावे. कारण अॅलर्जीची समस्या असल्यास वांग्याचे सेवन केले तर अॅलर्जी वाढते. शिवाय अंगाला खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचा लाल होणे आणि त्वचा सोलपटणे अशा समस्या जाणवतात. जर तुम्हालाही अशी कोणतीही परिस्थिती जाणवली तर त्वरित वांगी खाणे बंद करा.

२) अ‍ॅपेंडिसाइटिस – अ‍ॅपेंडिसाइटिसच्या रुग्णांनी वांग्याचे सेवन कोणत्याही प्रकारे करणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण, ऑक्सलेट हा घटक वांग्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. हा घटक मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे. यामुळे अश्या रुग्णांनी वांगी खाणे टाळावे.

३) रक्तदाबाची समस्या – ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी वांग्याचे सेवन करू नये. विशेषत: ज्यांना रक्तदाब कमी होण्याची समस्या आहे अश्या रुग्णांनी प्रामुख्याने वांग्याचे सेवन करू नये. यामुळे रक्तदाबावर विशेष परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु तरीही आपण वांग्याचे सेवन करीत असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

४) गर्भवती महिला – गर्भवती महिलांनी वांग्याचे सेवन करू नये. याचे अगदी साधे आणि सोप्पे कारण म्हणजे, वांगी स्वभावाने प्रचंड गरम असतात. ज्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो. यामुळे जास्त वांगी खाल्ली असता गर्भपात होण्याचा धोकाही असतो.

५) अशक्तपणा – आपल्या शरीरात सतत अशक्तपणा जाणवत असेल तर आपण वांग्याचे सेवन करू नये. कारण वांगी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तपेशींवर परिणाम होत असतो. यामुळे डॉक्टरसुद्धा रक्ताची अडचण असणाऱ्या रुग्णांना वांगीचे न खाण्याचा सल्ला देतात.

६) मूळव्याधीची समस्या – मूळव्याधीची समस्या असेल तर वांग्याचे सेवन मुळीच करू नये. कारण वांगी स्वभावाने वातड असतात. यामुळे जर तुम्हीही रक्तरंजित व्याधीच्या समस्येने त्रासलेले असाल तर वांगीपासून दूर रहा.

७) ओव्हर वेट – जर तुमचे वजन जास्त असेल तर वांग्याचे सेवन करू नका. कारण वांग्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि यामुळे वजन वाढण्याची शक्यता शकते. शिवाय मन खराब होते आणि मड स्विंगची समस्या त्रास देते. म्हणून अशा लोकांनी वांगीचे सेवन कमी केले पाहिजे.

० महत्वाचे – जर तुम्हाला कधीही वांगीचे सेवन करून पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्वरित वांग्याचे सेवन करणे वांड करा अन्यथा हि स्थिती गंभीर स्वरूपाच्या आजाराची स्थिती निर्माण करू शकते.