हॅलो आरोग्य ऑनलाईन| निरोगी जगणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेणे हि ज्याची त्याची प्राथमिक जबाबदारी आहे. आता हेल्दी राहायचे असेल तर फार कष्ट घ्यावे लागतात अशी एक सर्वसामान्य समजूत आहे. तर या समजुतीपासून थोडे अंतर राख आणि आम्ही सांगतो तो साधा सोप्पा उपाय एकदा आजमावून पहा. आपल्या शरीराला सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. कारण डिहायड्रेशनमूळे अनेक समस्या उपस्थित होतात. ज्यामध्ये हृदय संबंधित रोग, किडनी विकार आणि इतर बरेच भयंकर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वेळीच भरून काढणे आवश्यक आहे.
शरीराला हायड्रेट करण्यासाठी फार मेहनत घेण्याची गरज नाही. एकतर दिवसभरात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्या. जर नुसते पाणी पिणे अवघड वाटत असेल तर रोजच्या आहारात लिंबू आणि गूळ या दोन पदार्थांचे मिश्रण घ्या. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये मेटाबॉलिज्म सुधारण्याची क्षमता आहे. परिणामी वजन नियंत्रणात राहील. याशिवाय पोटाचे विकार होणार नाहीत. डिहायड्रेशन तर विसरूनच जा आणि अजून बरेच फायदे होतील. पण त्यासाठी आधी लिंबू पाण्याचे आणि गुळाचे मिश्रण कसे तयार करायचे आणि कसे सेवन करायचे हे समजून घ्या.
० असे तयार करा लिंबू- गुळाचे मिश्रण



० लिंबू गुळाच्या मिश्रणाचे फायदे –
लिंबामध्ये व्हिटामिन सी भरपूर असते. जे आरोग्यासाठी गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे हे पेय प्यायल्याने वजन वाढायची भीती वाटत नाही.
या मिश्रणात अँटी ऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियमचा समावेश असतो ज्यामुळे शरीराची इम्युनिटी बळकट होते.
हे पेय इम्यूनिटीसह मेटाबॉलिजम रेट वाढविण्यास सहाय्यक आहे.
याशिवाय हे पेय दररोज प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो.