Eliminate the problem of flatulence
|

पोटातील गॅस च्या समस्या अश्या करा दूर

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या शरीरात अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने जर अन्न खाल्ले तर मात्र गॅस च्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवू शकतात. गॅस हा कोणत्याही वयातील लोकांना हा होऊ शकतो. म्हणजे त्याचा प्रकार हा फक्त वयस्कर लोकांनाच आहे असे काही नाही. पोटातील गॅस योग्य वेळी बाहेर पडणे हे जास्त आवश्यक आहे. जर त्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर मात्र मोठया समस्या या जाणवू शकतात. त्यासाठी कोणते घरगुती उपाय असतील त्याबद्धल माहिती घेऊया …..

— गॅसेस चा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी पाणी भरपूर पिणे फार आवश्यक आहे. परंतु पाणी पिण्याचे सुद्धा काही नियम आहेत.

—- सकाळी उठल्या नंतर आपल्या शरीराला भरपूर पाण्याची गरज असते तेव्हा सकाळी तुम्ही भरपूर पाणी प्या, शक्य झाल्यास तांब्याच्या भांड्यात रात्रभर भरून ठेवलेले पाणी प्यावे.

— नंतर दिवसभर हळू हळू पाणी पीत राहावे, परंतु जेवण करण्या अगोदर कमीत कमी १ तास अगोदर १ ग्लास पाणी प्यावे.

—- रात्री झोपण्या अगोदर भरपूर पाणी पिऊ नये.

— काही प्रमाणात योगासने सुद्धा करावीत, गॅसेस साठी पवनमुक्तासन हे खूप फायदेशीर आहे.

— जे जेवणार ते व्यवस्थित चावून खा.

— जेवण झाल्यावर एक तासानंतर पाणी प्या. जेवताना पाणी पिऊ नये.पाण्यात जिरे टाकून उकळा. आणि ते पाणी पिण्यासाठी वापरा.