| |

दालचिनीचा १ तुकडासुद्धा संधिवातापासून सुटका देऊ शकतो; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो की दालचिनी खड्या मसाल्यातील एक प्रसिद्ध मसाला आहे. इतकेच काय तर आरोग्यासाठीसुद्धा ती उत्तम आहे, हेही आपण जाणतो. पण मुळात कशी? हे काय आपल्याला ठाऊक नाही बुआ अस म्हणणारे त्याहून अधिक आहेत. नाही का? मुळात दालचिनीमध्ये अँटी बैक्टीरियल आणि अँटी फंगल गुणधर्म समाविष्ट असतात. शिवाय दालचिनीत पॉलीफेनॉल असते. जे पोटाशी संबंधित विकारांवर फायदेशीर असते. इतकेच नव्हे तर, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास देखिल मदत करते आणि सांधेदुखीचा त्रास कमी करते. या व्यतिरिक्तसुद्धा असे अनेक फायदे आहेत जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्यासाठी हा लेख तुम्हाला पूर्ण वाचवा लागेल.

० दालचिनीचा आरोग्यासाठी वापर आणि फायदे

१) पोटाच्या समस्यांवर प्रभावी
– दालचिनी पोटाशी संबंधित समस्यांवर अत्यंत प्रभावशाली पद्धतीने कार्यरत असते. त्यामुळे पोटाच्या कोणत्याही समस्येसाठी दालचिनीचा वापर फायदेशीर मानला जातो. तसेच पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासही दालचिनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
० यासाठी १ चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने फायदा होतो.

२) रोग प्रतिकारशक्तीत वाढ
– दालचिनीचा वापर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील केला जातो. यासाठी दालचिनीचा चहा किंवा त्याचे पाणी खूप फायदेशीर असते. दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल, अँटी-व्हायरल, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्तीला चालना मिळते.
० यासाठी एक कप पाण्यात २ दालचिनीच्या काड्या टाकून पाणी उकळून घ्यावे आणि ते पाणी आठवड्यातून किमान एकदा तरी प्यावे.

३) मधुमेहावर नियंत्रण
– दालचिनी मधुमेहावर आणि मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण दालचिनीचे सेवन केल्याने शरीरात असणाऱ्या रक्तातील साखरेची पातळी उत्तमरीत्या नियंत्रित राहते आणि मधुमेहात आराम मिळतो.
० यासाठी एकतर दालचिनी पावडर पाण्यात घोळून प्यावी किंवा दालचिनीचा चहा बनवून साखरेऐवजी गुळाचा वापर करा.

४) वेदनेवर परिणामकारक
– दालचिनी संधिवात ,अर्थराइटिस दुर करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आर्थरायटिसमुळे त्रस्त असाल आणि असह्य वेदना होत असतील, तर दालचिनी अत्यंत प्रभावी आहे. यामुळे अंगदुखी, शरीराची सूज लगेच कमी होते.
० यासाठी आठवड्यातून २-३ वेळा दालचिनीचे पाणी प्या.

५) वजन कमी करण्यास मदतयुक्त
– दालचिनी मेटाबोलिस्म रेट वाढवते. ज्यामुळे वजन कमी करणे सोप्पे होते. त्यामुळे दालचिनीचा वापर वजन झपाट्याने कमी करण्यासाठी केला जातो. शिवाय दालचिनीचे पाणी भूक शमवते. यामुळे वजन कमी आणि नियंत्रित राहते.
० यासाठी दररोज सकाळी दूध, चहाच्या जागी दालचिनी पावडर चे पाणी किंवा चहा प्या.