| |

रात्री निवांत झोपलात तरी १००% वजन कमी होणार; कसं? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल सगळ्यात मोठी समस्या कोणती असा जर कुणी प्रश्न विचारला तर उत्तर अगदीच सोप्प आहे. वाढणारे वजन. होय. कारण गेल्या वर्षभरात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. शिवाय दैनंदिन जीवनातील लहान सहन चुका आपल्या वाढत्या वजनाचे मूळ कारण होऊ लागल्या आहेत. यामुळे अनेकांचे वजन इतक्या झपाट्याने वाढले कि, आता हे वजन कमी करण्यासाठी हि मंडळी अनेको उपाय करीत आहेत. तसे वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण ते केल्यास वजन कमी होतेच असे नाही. कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला साजेसे उपाय करावे. कदाचित आता आम्ही जे सांगू ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की, रात्री झोपूनही वजन कमी करता येते. नाही बसत ना विश्वास? वाटलंच होत. चला तर मग लगेच जाणून घ्या त्यासाठी काय करायला हवं खालीलप्रमाणे:-

१) जेवणाची वेळ पाळा – झोपण्यापूर्वी तुम्ही किती वेळ आधी जेवता हे देखील तुमच्या वजन वाढण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे तुमची जेवणाची वेळ जर तुम्ही नीट पाळली नाही तर झोपताना तुमचे वजन वाढू अथवा कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा. जर तुमची जीवनशैली उशीरा जेवण्याची आणि त्यानंतर लगेच झोपण्याची असेल तर तुमचे वजन वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवाय रात्रीचे जेवण खूप हलके आणि पचण्यास योग्य असेल याची काळजी घ्या. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहिल. यासोबतच जाणून घ्या तुमचे वजन अचानक कमी होऊ लागले आहे का

२) शांत आणि पूर्ण झोप घ्या – वजन कमी करण्यासाठी झोप पू्र्ण होणे गरजेचे आहे. कारण अपुरी झोप वजन वाढीस कारणीभूत असू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या. तज्ञ्जांच्या मते शांत व पूर्ण झोप संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शिवाय पूर्ण झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो व त्याच्या कार्यप्रणालीत सुधार होतो.

३) शीतल व अंधाऱ्या जागी झोपणे – एका संशोधनानुसार, जे लोक उच्च तापमान व उजेड असलेल्या खोलीत झोपतात त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा परिणाम थेट आरोग्यावर आणि वजनावर होतो. यासाठी झोपताना खोली नेहमी थंड व शीतल वातावरणाची असावी. याचसोबत अंधार असलेली असावी. ज्यामुळे झोप पूर्ण होईल आणि वजन नियंत्रणात राहील.

४) डिजिटल स्क्रीनचा वापर कमी करा – शांत झोप लागावी यासाठी किमान अर्धा तास आधी डिजिटल स्क्रीन अर्थात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही बंद करा. कारण रात्री झोपेपर्यंत यांचा वापर केल्यास त्यातून येणाऱ्या प्रकाश लहरी मेंदूवर परिणाम करतात आणि परिणामी झोप अपूर्ण होते शिवाय अनिद्रेचा त्रास संभवतो. काही संशोधनानुसार, रात्री अश्या उपकरणांच्या वापरण्यामुळे झोप कमी आणि भुक जास्त लागते. साहजिकच यामुळे वजन वाढते.