पोटावरील अतिरिक्त चरबी जाता जाईना..?; जाणून घ्या उपाय

0
475
Belly Fat
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालची जीवनशैली इतकी धावपळीची आहे कि जगायलासुद्धा वेळ नाही. मग खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कुठून असणार..? नाही का..? त्यामुळे मग वेळ मिळेल तेव्हा खाणे.. काहीही खाणे.. कितीही खाणे किंवा मग कितीही वेळा खाणे. दिवसभरात आपण काय खातो..? किती खातो..? कधी खातो..? याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो. ज्यामुळे अनेकदा आपले वजन हळूहळू वाढत जाते आणि आपल्याला कळतसुद्धा नाही. परिणामी एका मर्यादेनंतर आपला लठ्ठपणा इतका वाढलेला असतो कि शरीरावर विविध ठिकाणी चरबी जमा होते. यात प्रामुख्याने मानेचा भाग, पाठ, दंड, मांड्या, पोटऱ्या आणि विशेष करून पोटावर हि चरबी प्रमाणापेक्षा जास्त साठू लागते. कालांतराने ती गळताना दिसते आणि मग न्यूनगंडाची भावना निर्माण होते.

लठ्ठपणा वाढला की पोटाची चरबीही वाढू लागते. ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे जगभरातील किमान ७०% लोक ग्रासलेले आहेत. शिवाय हे लोक चिंतित आहेत. याचे कारण म्हणजे काही केल्या हि हट्टी चरबी काही जायचे नाव घेत नाही. खूप डाएट, खूप व्यायाम सगळं काही खूप करून पाहिलं तरीही चिंता कायम आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आरोग्य तज्ञांनी सांगितलेल्या उपायांबद्दल सांगणार आहोत. तुम्हालाहि जाणून घ्यायचे असतील हे उपाय तर हा लेख पूर्ण वाचा.

० पोटावरील चरबी घालवणारे प्रभावी उपाय

१. कोमट पाणी – जर तुम्ही लठ्ठ असाल आणि शरीरावर ठिकठिकाणी चरबी साठली असेल तर जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तेव्हा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कारण कोमट पाणी चयापचय सक्रिय करते आणि वजन वेगाने कमी करण्यास मदत करते. यामुळे शरीर हायड्रेट राहते शिवाय पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबीही कमी होते. यासाठी पाण्याशिवाय फळे आणि ज्यूसचेदेखील सेवन करणे फायदेशीर आहे.

Full Plate Of Food

२. लो कॅलरी डिनर – दुपारच्या वेळी पचनशक्ती मजबूत असल्यामुळे दुपारी दिवसभरातील आवश्यक ५०% कॅलरीजचे सेवन करा. पण रात्री कमीत कमी कॅलरीज घ्या. शिवाय डिनर संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी खा. यामुळे पोटाची चरबी वाढत नाही. तसेच मिठाई, साखरयुक्त पेये आणि तेलकट पदार्थ यांसारख्या रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सचे सेवन करू नका.

Dry Ginger

३. सुंठ पावडर – आले कोरडे झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी होते. याला सुंठ म्हणतात. सुंठीच्या पावडरमध्ये थर्मोजेनिक असते. हे चरबी जाळण्यात फायदेशीर असते. सुंठ पावडर पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते आणि अतिरिक्त चरबी जाळते.

Trifala

४. त्रिफळा चूर्ण – त्रिफळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून पचनसंस्था मजबूत करते. त्यामुळे त्रिफळा चूर्ण पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी आहे. यासाठी कोमट पाण्यात १ चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून दररोज प्या.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here