| |

पपईचे अति सेवन देई अनेको आजारांना आमंत्रण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। होय हे खरं आहे कि, पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. शिवाय पिकलेली पपई चवीला खूपच चविष्ट असल्यामुळे ती फास्ट करणे फारसे अबवघड नसते. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिनची योग्य मात्र असते. शिवाय पपईचे सर्वात जास्त उत्पादन आपल्या भारतातच होते, म्हणून त्याचे अत्याधिक सेवन करणे गरजेचे आहे असे कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे जर तुम्हाला पपई आवडतो म्हणून त्याचे तुम्ही गरजेपेक्षा जास्त सेवन करत असाल तर आताच सावध व्हा. कारण पपईचा गुणधर्म उष्ण आहे. यामुळे त्याचे अधिक सेवा शरीरासाठी हानिकारक होऊ शकते.

प्रामुख्याने उन्हाळ्यात पपई खाणे टाळणे अगदी उत्तम. कारण मुळात उन्हाळ्यामध्ये आपली पचनक्रीया थोडी नाजूक झालेली असते. त्यात पपई पचायला जड असल्यामूळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. शिवाय पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाल्ली असता करपट ढेकर येणे, अपचन, जुलाब किंवा उलट्या होण्याचा धोका असतो. याशिवाय काहीवेळा थंडीत पपई खाल्ल्यानेही पोटदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते

मुळातच पपईचा गुणधर्म उष्ण असल्याने अति पपईचे सेवन शरीरातील उष्णता वाढते. शिवाय पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते. जे गर्भाशयात संकुचन निर्माण करू शकते. कारण नियमित पपईच्या सेवनाने शरीरातील इस्ट्रोजनचे प्रमाण साहजिकच वाढते. जे मासिक पाळीसाठी किंवा मासिक पाळीत उदभवणाऱ्या अन्य समस्यांना उभारी देते. त्यामुळे पपईचे अतिसेवन स्त्रियांसाठी विशेष घातक आहे. यात मुख्य बाब अशी कि, गरोदर अवस्थेमध्ये स्त्रियांनी पपईचे सेवन प्रामुख्याने टाळावे. एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना व त्यांच्या बाळाला याचा फार त्रास होतो.

या व्यतिरिक्त ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांनी देखील पपई जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण, जास्त पपई खाल्ल्याने हृदयाचे ठोके गरजेतून कमी प्रमाणात सुरु राहतात. यामुळे हृदयाशी संबंधित इतर अनेक समस्या वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हृदयरोग्यांनी किंवा हृदयाशी संबंधित रूग्णांनी पपईचे सेवन करणे हे त्यांच्यासाठी योग्य आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *